बरगड्यांना फ्रॅक्चर, डोक्याला किरकोळ जखमा, पण प्रकृती स्थिर; धनंजय मुंडेंच्या कार्यालयाची माहिती
Dhananjay Munde Health Updates: बरगड्यांना फ्रॅक्चर आणि डोक्याला किरकोळ जखमा, पण प्रकृती स्थिर असल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Dhananjay Munde Health Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे (Dhananjay Munde Accident) यांच्या छातीला मार लागला असून सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात सविस्तर माहिती देत चिंतेचं कारण नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांच्या छातीला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं रिपोर्ट्समधून निष्पन्न झालं आहे. तसेच, अपघातात त्यांच्या डोक्यालाही काही जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्यासाठी योग्य त्या तपासण्या करण्यात आल्या. डोक्याला झालेल्या जखमा बाहेरून आहेत. काही दिवसांतच त्या बऱ्या होतील, असंही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून बेल्ट लाऊन आराम करणं हा एकमेव उपचार असल्याचं धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नेते मंडळींकडून धनंजय मुंडेच्या प्रकृतीची विचारपूस
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांनी रूग्णालय प्रशासनाकडून धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी ब्रिज कॅंडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यासोबतच काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनीही रूग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रीया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत फोनवरून चौकशी केली.
कसा झाला धनंजय मुंडेच्या गाडीचा अपघात?
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत होते. त्यानंतर साडेअकरा वाजता रात्री परळी शहरात आले. परळीहून आपल्या राहत्या घरी रवाना झाले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे यांची त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) त्यांच्या घराजवळ असलेल्या मौलाना आझाद चौकामध्ये आली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठं नुकसान झालं आहे.
अपघातात धनंजय मुंडेच्या गाडीचा चक्काचून झाला. एअरबॅग्स उघडल्या. एअरबॅग्स उघडल्यामुळेच मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर प्राथमिक तपासणीनंतर धनंजय मुंडेंच्या छातीला मार लागल्याचं निष्पन्न झालं. बुधवारी दुपारी मुंडेंना एअर अॅम्ब्युलन्सनं मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडेंना छातीला मार लागला आहे. तसेच, किरकोळ दुखापत झाली असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावरुन दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Dhananjay Munde Accident : गाडीचा चक्काचूर, एअर बॅग्स उघडल्या; अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला मार