एक्स्प्लोर

Dapoli Khed Mandangad : बंडाळीनंतर दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय? 'कदमां'ना फायदा की नुकसान?

Dapoli Khed Mandangad Vidhan sabha constituency :  रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेला मतदारसंघ म्हणजे दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात काय स्थिती...

Dapoli Khed Mandangad Vidhan sabha constituency :  रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेला मतदारसंघ म्हणजे दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघ. इथं आमदार शिवसेनेचा पण खासदार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. कारण, या विधानसभा मतदारसंघातील काही भाग हा रायगड लोकसभा मतदारसंघात येतो. अर्थात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम या ठिकाणाहून आमदार आहेत. योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत रामदास कदम यांनी शिवसेनेतील एकंदरीत साऱ्या परिस्थितीवर टीकास्त्र डागलं. माझी शिवसेनेनं हकालपट्टी केली नाही तर मीच राजीनामा दिला अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले होते. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे असलेले अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील वादामुळे देखील या मतदारसंघातील घडामोडी अधिक चर्चिल्या गेल्या होत्या. अगदी दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीवेळी रामदास कदम आणि योगेश कदम यांना बाजूला सारत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना सक्रीय केलं गेलं होतं. यावेळी कदम यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या होत्या. किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यामुळे देखील या मतदारसंघातील घडामोडी राज्याच्या राजकारणात चर्चिल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे या ठिकाणची गणितं कशी बदलणार? त्याठिकाणी राजकीय स्थिती सद्यस्थितीत कशी आहे? कुणाच्या बाजुनं आणि कुणाच्या विरोधात आहे? याबाबत देखील जाणून घेतलं. 

कोकणातील शिवसेनेची स्थिती काय, वाचा- Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडानंतर कोकणात शिवसेनेची काय स्थिती? फायदा नेमका कुणाला?

रामदास कदम यांचा संपर्क चांगला
याबाबत आम्ही दैनिक सकाळचे पत्रकार चंद्रशेखर जोशी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना त्यांनी 'सध्या तरी योगेश कदम यांना कुणी सक्षम विरोधक आहे असं म्हणता येणार नाही. योगेश कदम यांनी निधी देखील चांगला आणला आहे. गावच्या पायवाटेपासून ते नळपाणी योजनेपर्यंत त्यांनी कामं केली आहे. कदाचित इतक्या प्रमाणात आलेला निधी हा पहिलाच असावा. त्यामुळे विकासकामं देखील झालेली आहे. पण, शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे याबाबत कुठं वाच्यता झाली नाही. शिवाय रामदास कदम यांचा संपर्क देखील चांगला आहे. सध्याच्या स्थितीत रामदास कदम देखील या ठिकाणी लक्ष अधिकपणे देतील. त्यांचा संपर्क देखील चांगला आहे. कारण हा भाग दुर्गम असला तरी रामदास कदम यांनी हा सारा भाग पिंजून काढला आहे. त्यांच्या काळात देखील कामं झालेली आहेत. शिवाय, लोकं देखील जोडली गेली आहेत. त्यांचा एक भाऊ जिल्हा परिषद सदस्य राहिलेला आहे. त्यांचा खेडमध्ये संपर्क आहे. या साऱ्याचा विचार करता सध्या तरी इथं कदमांना आव्हान देईल असा उमेदवार सद्यस्थितीत नाही. पण, महाविकास आघाडी, एखादा चांगला उमेदवार दिल्यास, शिवसेनेनं आतापासून लक्ष दिल्यास या ठिकाणी सध्या योगेश कदम यांना सोपं वाटणारं गणित बदलू शकते' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. 

राजापूर मतदारसंघात काय हालचाली-  Rajapur Assembly Constituency : शिवसेनेतील बंडाळीनंतर राजापूरमध्ये पडझड नाही, पण..

खेडमध्ये मनसेचे वैभव खेडेकर यांची भूमिका महत्वाची
त्यानंतर आम्ही शैलेद्र केळकर यांच्याशी देखील संवाद साधला. यावेळी बोलताना केळकर यांनी देखील योगेश कदम यांना सद्यातरी पर्याय नाही. पण, शिवसेनेकडून उमेदवार कोण असेल? हे देखील पाहायाला हवं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेत प्रवेश करू शकतात असं सांगितलं जात आहे. पण, कदमांचा प्रवेश केव्हा होणार? त्यानंतर त्यांच्याकडून किती प्रभावीपणे यंत्रणा राबवली जाते. पक्षाकडून त्यांना किती पाठबळ दिलं जातं? मुख्यबाब म्हणजे महाविकास आघाडी झाल्यास शिवसेना राष्ट्रवादीसाठी ही जागा सोडणार का? हे पाहावं लागेल. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी निधी देत मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न सत्तेत असताना केला होता. शिवाय, सध्या शिंदे गट आणि शिवसेना अशी चर्चा होत असताना योगेश कदम यांना या मतदारसंघात असलेली भाजपची साधारण 20 हजारांच्या घरात असलेली मतं मिळणार का? याचा देखील परिणाम या ठिकाणी होणार आहे. तर, खेडमध्ये मनसेचे वैभव खेडेकर यांची भूमिका देखील पाहावी लागेल. किमान शहरातील मतदारांवर ते प्रभाव पाडू शकतात. सध्या शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर रामदास कदम यांचे केबल व्यवसायिक बंधू सदानंद कदम यांच्या चालीकडे देखील पाहावं लागेल. कारण, अनिल परब आणि त्यांचे संबंध चांगले आहेत.यापूर्वी त्यांनी योगेश कदम यांना मदत केलेली आहे. पण, आता शिंदे विरूद्ध ठाकरे लढाईत त्यांची भूमिका काय असणार हे पाहावं लागणार आहे. अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

गुहागरमध्ये काय होणार, वाचा - Guhagar Assembly constituency : गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचं पारडं जड, पण...

शिवसेना एकला चलो चा नारा देणार?

योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आपली नाराजी बोलून दाखवली होती. शिवाय, शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं. यापूर्वी दापोलीतील अनिल परब आणि कदम यांच्यातील वाद हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना एकला चलो चा नारा देणार? का महाविकास आघाडी म्हणून लढणार हे निर्णायक असेल. शिवाय, महाविकास आघाडी झाल्यास त्या ठिकाणचा उमेदवार आणि मित्र पक्षांची साथ देखील या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. दापोली - खेड - मंडणगड हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. पण, योगेश कदम एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि सारी गणितं बदलली. त्यामुळे या ठिकाणची लढाई शिवसेनेसाठी सोपी नसणार आहे हे या ठिकाणच्या जाणकारांशी बोलल्यानंतर जाणवत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ratnagiri - Sangameshwar constituency : उदय सामंत यांचा रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ, जाणून घ्या काय आहे सद्यस्थिती?

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडानंतर कोकणात शिवसेनेची काय स्थिती? फायदा नेमका कुणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ware Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
Embed widget