(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jaykumar Gore : आमदार जयकुमार गोरे यांना डिस्चार्ज; ठणठणीत बरे होऊन म्हणाले...
Jaykumar Gore Discharge : भाजपचे माण- खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते हेलीकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले.
Jaykumar Gore Discharge : भाजपचे माण- खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (jaykumar gore) यांना आज (5 जानेवारी) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून (Rupy hall clinic) डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर (Pune) ते हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी रवाना झाले. नागपूरमधे हिवाळी अधिवेशन सुरु असताना आमदार जयकुमार गोरे हे रात्री उशीरा नागपूरहून विमानाने पुण्यात आले होते आणि पुण्यातून त्यांच्या गावी जात असताना रात्री साडेतीन वाजता फलटणजवळ त्यांच्या गडीला अपघात झाला होता. पुलाचा कठडा तोडून त्यांची गाडी तीस फुट खोल खाली कोसळली होती. त्यानंतर आमदार गोरे यांना उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं होतं.
'सगळ्यांचा मी आभारी आहे'
रुबी हॉलमध्ये दाखल असल्याच्या या दिवसात मला वॉर्ड बॉय, नर्स, केअर टेकर, डॉक्टर्स यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेतली आणि या दृष्टिकोनामुळेच माझी तब्येत अपेक्षेपेक्षा खूप लववकर ठिक झाली. माझी अत्यंत काळजी घेतल्याबद्दल डॉ. पुर्वेझ ग्रांट, डॉ. झिरपे आणि न्यूरो ट्रॉमा युनिट टीमचा आभारी आहे, असं म्हणत आमदार गोरेंनी टीमचे आभार मानले.
गोरे यांची गाडी एसयूव्ही ज्या खड्ड्यात पडली तो खड्डा किमान 30 फूट खाली होता. त्यामुळे आमदारांच्या छातीत फ्रॅक्चर झाले होते. अपघातानंतर छातीत दुखापत आणि छातीचा घोट फ्रॅक्चर झाल्याने त्यांना क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. छातीतील हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे आठवडाभरापूर्वी त्यांना जेंव्हा दाखल केले तेव्हा त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.त्यासोबतच वेदनाही भरपूर झाल्या मात्र त्यांनी धीर सोडला नाही ते खचले नाहीत. उपचारालादेखील त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्हाला देखील योग्य वेळी योग्य उपचार करता आले, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
नेत्यांनी केली होती तब्येतीची चौकशी
24 डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता फलटण तालुक्यातील मलठण येथे बाणगंगा नदीत कार कोसळून अपघात झाला होता. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते. यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर, स्वीय सहाय्यक आणि पोलीस सुरक्षारक्षक देखील होते. त्याचवेळी पहाटे जयकुमार गोरे यांना तातडीने पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन सहकाऱ्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गोरे यांना मदत केली. त्यानंतर गोरे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.