एक्स्प्लोर

नुकसान टळणार, पिकांचं संरक्षण होणार! शेतकऱ्यांसाठी युवकानं लढवली शक्कल, तयार केलं भन्नाट तंत्रज्ञान 

नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकानं विकसीत केलंय. गारपीट आणि अवेळी पडणारा पाऊस (Rain) यापासून द्राक्ष (grapes) तसेच पॉलिहाऊसचे (Polyhouse) संरक्षण व्हावे यासाठी हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे.

Plant and Polyhouse Security Model : अलिकडच्या काळात तरुण वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान विकसीत करत आहेत. जेणेकरुन या तंत्रज्ञानाच्या (technology) माध्यमातून कमी वेळात अधिक काम व्हावं आणि धोका कमी असावा ही काळजी घेतली जातेय. असंच एक नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकानं विकसीत केलं आहे. गारपीट आणि अवेळी पडणारा पाऊस (Rain) यापासून द्राक्ष (grapes) तसेच पॉलिहाऊसचे (Polyhouse) संरक्षण व्हावे यासाठी हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. Plant and Polyhouse Security Model असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. महेश कोरे (Mahesh Kore) असं हे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या युवकाचं नाव आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी काहीतरी करावं हा उद्देश

महेश कोरे यांचे मूळ गाव हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे हे आहे. त्यांचे शिक्षण हे  वाडीया कॉलेज पुणे येथून केमिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. त्यानंतर आयआयटी मुंबईतून Incubity from SINE Innovation Incubation Center IIT Bombay हे शिक्षण घेतलं आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी काहीतरी करावं या उद्देशानं महेश कोरे यांनी Plant and Polyhouse Security Model हे तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. या तंत्रज्ञानामुळं गारा आणि अवेळी पडणारा पाऊस यापासून द्राक्षे तसेच पॉलिहाऊसचे संरक्षण होते. 

नेमकं काय आहे तंत्रज्ञान?

दरम्यान, Plant and Polyhouse Security Model या तंत्रज्ञानाच्या संदर्भात एबीपी माझाने महेश कोरे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जर तंत्रज्ञान जर मोठ्या प्रमाणात विकसीत झालं तर शेतकऱ्यांच्या पिकांचे  अवकाळी पाऊस आणि गारपीटीपासून नुकसान होणार नाही. अवकाळी पाऊ आणि गारपीट यामुळं दरवर्षी शेतकऱ्यांना जोर फटका बसतो, तो या तंत्रज्ञानामुळं बसणार नसल्याचे महेश कोरे म्हणाले. त्यामुळं शासनाला नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना द्यावा लागणारा निधी देण्याची गरज भासणार नसल्याचे महेश कोरे म्हणाले. जर शासनानं आम्हाला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात विकसीत करण्यासाठी सहकार्य केलं तर शेतकऱ्यांच्या पिकांचं होणारं नुकसानं टळेल. तसेच शासनाचा सुद्धा पैसा वाचेल असे महेश कोरे म्हणाले. सोलापूरमध्ये एका ठिकाणी पॉलिहाऊस पडलेल्यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. ते पाहून मला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही यासाठी काहीतरी करावं असं वाटलं. त्यानंतर मी Plant and Polyhouse Security Model हे तंत्रज्ञान विकसीत केल्याचे महेश कोरे यांनी सांगितलं. गारा आणि अवकाळी पावासाच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान सक्रिय होऊन संपूर्ण द्राक्ष आणि पॉलिहाऊस झाकते. 10 मिनीटात एक एकर क्षेत्र कव्हर होत असल्याची माहिती महेश कोरे यांनी दिली.

प्रकल्प विकसीत करण्यासाठी शासनाकडून मदत मिळवण्यासाठी कोरे प्रयत्नशील

प्रकल्पाचे महत्व पाहून प्रकल्पास अविष्कार 2019 संशोधन महोत्सवात 19 विद्यापीठातून महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले होते. या प्रकल्पाला मदत मिळावी यासाठी महेश कोरे प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी जिल्हास्तर डी पी डी सी सोलापूर,  राज्यस्तर कक्ष अधिकारी 3 अ, कृषी मंत्रालय, मुंबई तसेच सहसचिव MIDH, कृषी भवन, न्यू दिल्ली येथे प्रस्ताव पाठवले आहेत. पण हे प्रस्ताव सध्या प्रलंबित असून प्रशासकीय मान्यतेनुसार शासनाने अजून देखील निधीबाबत योग्य तो निर्णय घेतलेला नाही. तरी प्रकल्पाचे महत्त्व पाहून लवकरात लवकर केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री व पालकमंत्री सोलापूर यांनी प्रकल्पास योग्य ती मदत करावी अशी विनंती महेश कोरे यांनी केली आहे. प्रकल्प विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण निधी अंतर्गत महेश कोरे, फाउंडर डायरेक्टर, इनोव्हेशन ड्रिवन सोसायटी, पुणे हे प्रयत्नशील आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

दाट धुक्यातही विमानांचं लँडिंग होणार, मात्र मासिक खर्च 50 लाख; 'हे' तंत्रज्ञान ठरतेय उपयुक्त 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget