(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Dhangekar: पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करुन निलंबित करा; अन्यथा व्हिडीओ ट्विट करण्यात येईल, रवींद्र धंगेकरांचा इशारा
Ravindra Dhangekar: पुणे पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला असून बिल्डर कुटुंबाच्या पैशाच्या पाकिटाखाली पोलीस दबलेले आहेत, असा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात येत आहे.
Ravindra Dhangekar: पुणे: पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने अलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून दोन संगणक अभियंताना चिरडले. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत असतानाच पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सरकार आणि पुणे पोलिसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा दाखवला असून बिल्डर कुटुंबाच्या पैशाच्या पाकिटाखाली पोलीस दबलेले आहेत, असा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात येत आहे.
रवींद्र धंगेकर यांनी आज पुन्हा एक ट्विट करत पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. मुंढवा पोलीस स्टेशन अवघे 3 कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. रवींद्र धंगेकरांनी या ट्विटसोबत एक फोटोही जोडला आहे. यामध्ये वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत, असं धंगेकरांनी म्हटलं आहे. रवींद्र धंगेकरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.
दिवस 1ला - मुंढवा पोलीस स्टेशन
हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात. सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासांत यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील, असा इशारा देखील रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर… pic.twitter.com/GP7uIC0JTk
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 24, 2024
गुन्हा दडपण्याच्या "डिल" मध्ये कमिश्नरदेखील सहभागी-
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी झालेल्या कारवाईवरुन आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवरुन पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहे. ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांनी आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. गुन्हा दडपण्याच्या "डिल" मध्ये कमिश्नर देखील सहभागी आहेत,त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.