एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Pune Express Highway Accident : आग विझवायला गेले, केमिकल पसरलं अन् भडका झाला, जवान थोडक्यात बचावले; अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. केमिकलचा टँकर मार्गावरून हटवणारी क्रेन कशी पेटली हे या दृश्यात कैद झालं आहे.

Mumbai Pune Express Highway Accident : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाचा आणखी एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. केमिकलचा टँकर मार्गावरून हटवणारी क्रेन कशी पेटली हे या दृश्यात कैद झालं आहे. सुदैवाने बचाव पथकातील सर्व सदस्य थोडक्यात बचावले. रेस्क्यू ऑपरेशन करताना बचाव पथकांचा जीव कसा धोक्यात असतो, हे यातून दिसून येत आहे.

अपघातानंतर पेट घेतलेल्या मिथेनॉलच्या टँकरची आग आटोक्यात आली. त्यानंतर क्रेनच्या साहय्याने हा टँकर मार्गाखाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचवेळी टँकरमधील उरलेले केमिकल मार्गावर पुन्हा पसरले आणि त्या केमिकलने पुन्हा एकदा पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यानं बचाव पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. क्रेन चालकाने ही तातडीनं बाहेर उडी घेत स्वतःचे प्राण वाचवले. 

रेस्क्यू ऑपरेशन वेळी बचाव पथकांचा जीव कसा धोक्यात जाऊ शकतो? हे तर यातून स्पष्ट दिसलंच मात्र हे कार्य करताना कसं प्रसंगावधान राखावे लागते,  हे देखील या बचाव पथकाने दाखवून दिले. अग्निशमन दलाचे जवान आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या बचाव पथकाच्या हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले.

थरारक रेस्क्यू ऑपरेशन...

मंगळवारी (13 जून)  दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी हा अपघात घडला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमनदलाने बचावकार्य सुरु केलं होतं. या टँकरची आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता होती. मात्र IRB यंत्रणा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी आग चांगलीच धुमसल्याचं पाहून यंत्रणांनी पुन्हा पाण्याचा मारा सुरु केला. हे सगळं सुरु असतानाच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आणणं अग्निशमन दलाच्या जवानांपुढे मोठं आव्हान होतं. पावसामुळे हे काम सोपं झालं. एवढं असूनही कुलिंगसाठी फार वेळ लागला. कुलिंग झाल्यावर क्रेनच्या साहय्याने टॅंकर रस्त्यांच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर टॅंकरचा झालेला कोळसा कर्मचाऱ्यांनी उचलला आणि तब्बल पाच तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं.

तिघांचा जीव कोणामुळे गेला?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील जळीतकांडाने एका कुटुंबावर घाला घातला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यात माय लेकासह भाच्याचा समावेश होता. होरपळलेल्या जखमींना द्रुतगतीवरील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार मिळणं अपेक्षित होतं. मात्र हा पांढरा हत्ती फक्त मलमपट्टीच्या कामाचा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget