![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Pune Express Highway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग धुमसल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय
आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली.
![Mumbai Pune Express Highway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग धुमसल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय Mumbai Pune Express Highway Traffic stopped again on Mumbai-Pune Expressway decision to stop traffic due to fire again Mumbai Pune Express Highway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक पुन्हा थांबवली, आग धुमसल्याने महामार्ग पोलीसांचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/13/801e380a6bfe66382caacf25726334ab168664664964489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Pune Express Highway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन जण दगावल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक केमिकल टँकर भरधाव वेगामुळे पलटी झाला आणि त्यानं पेट घेतला. मात्र पलटी झाल्यामुळे त्याच्यातलं केमिकल पुलाखालच्या रस्त्यावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडलं, तसंच काही वाहनांवरही सांडलं, ज्यामुळे पुलाखालील वाहनांनी पेट घेतला. दरम्यान, आग लागल्यावर दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली. मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र अजून बंदच आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकरला (Mumbai Pune Express Highway Tanker Fire) लागलेल्या आगीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट केलं आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, "मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे."
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2023
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत 3 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
राज्य पोलिस दल,…
नेमकं काय घडलं?
केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले आणि तेही या आगीत होरपळले. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)