Pune Drug : पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाधड कारवाई; 37 लाखांचे कोकेन, एमडी, गांजा जप्त
पुण्यात ड्रग्स तस्करी सुरुच आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 37 रुपये किंमतीचं ड्रग्स जप्त केलं आहे.
पुणे : पुण्यात ड्रग्स तस्करी (Pune drug) सुरुच आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल 37 रुपये किंमतीचं ड्रग्स जप्त केलं आहे. पुण्यातील कोंढवा, विश्रांतवाडी आणि वानवडी या परिसरात कारवाई करुन कोकेन, मेफेड्रॉन आणि गांजा जप्त करण्यात आला आहे.
उंड्री मिरॅकल लाईफ स्पेस सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर एक परदेशी नागरिक कोकेन विक्री करण्यासाठी आला आहे अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळाली पथकाने सापळा रचून हसेनी मुवीनी मीचाँग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 152 ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या कारवाईत किसन किसन नंदकिशोर लधार (वय 34, रा. न्यु दर्शन कॉलनी, कलवड वस्ती, लोहगांव, मूळ रा. बिकानेर, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 4 लाख 50 हजारांचे 22 ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. यासोबतच त्याच दिवशी आरोपी लधार हा धानोरीमधील माधवनगर रोड येथील अगत्य हॉटेलसमोर आला असून तो एमडीची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी कारवाई केली.
अन्न व औषध प्रशासनाचीदेखील करडी नजर
काही दिवसांपूर्वी दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली होती. देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन 23 जानेवारीला टाकलेल्या छाप्यानुसार 23 लाख 68 हजार 580 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. 125 , देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात 11 लाख 48 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आले होते.
इतर महत्वाची बातमी-