एक्स्प्लोर

Air Strike On A Buddhist Monastery In Myanmar: म्यानमारमध्ये रक्तपात सुरुच; फायटर जेटने मध्यरात्री बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, आतापर्यंत 75 जणांचा जीव गेला

Air Strike On A Buddhist Monastery In Myanmar: 2021 पासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरू आहे, जे फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने केलेल्या बंडानंतर सुरू झाले.

Air Strike On A Buddhist Monastery In Myanmar: गुरुवारी रात्री उशिरा म्यानमारच्या सागाईंग प्रदेशातील एका बौद्ध मठावर झालेल्या हवाई हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू झाला. लिन ता लू गावातील मठावर हा हल्ला झाला, जिथे जवळच्या गावांमधून 150 हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी आले होते. हल्ल्यात 30 जण जखमी झाले, त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रात्री 1 वाजता एका जेट फायटरने गावातील मठावर बॉम्ब टाकले. तथापि, हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. लष्कराने या घटनेबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. म्यानमारच्या स्वतंत्र डेमोक्रॅटिक व्हॉइस ऑफ बर्मा ऑनलाइन माध्यमांनुसार, मृतांचा आकडा 30 पर्यंत असू शकतो.

2021 पासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध 

2021 पासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध सुरू आहे, जे फेब्रुवारी 2021 मध्ये लष्कराने केलेल्या बंडानंतर सुरू झाले. सैन्याने आंग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेले सरकार पाडले. त्यानंतर देशात अशांतता पसरली. म्यानमारमधील गृहयुद्धाची सुरुवात 1 फेब्रुवारी 2021 रोजी लष्करी उठावाने झाली, जेव्हा लष्कराने नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) चे निवडून आलेले सरकार उलथवून टाकले आणि आंग सान सू की सरकारच्या नेत्यांना ताब्यात घेतले. लष्कराने 2020 च्या निवडणुकीत एनएलडीच्या विजयाला फसवे म्हटले, त्यानंतर व्यापक निदर्शने सुरू झाली. लष्कराच्या हिंसक दडपशाहीमुळे प्रतिकाराला जन्म मिळाला, ज्यामध्ये राष्ट्रीय एकता सरकार (एनयूजी) आणि त्याचे पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) तसेच अनेक वांशिक सशस्त्र झाला आहेसंघटना (ईएओ) यांचा समावेश आहे.

गृहयुद्धात आतापर्यंत 75 हजार लोकांचा मृत्यू 

या गृहयुद्धामुळे म्यानमारमध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, 1.76 कोटी लोकांना मदतीची आवश्यकता आहे, 30 लाखांहून अधिक विस्थापित झाले आहेत आणि 75 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. लष्करावर गावे जाळण्याचा, हवाई हल्ले करण्याचा आणि युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे, ज्याचा रोहिंग्या समुदायावरही परिणाम झाला आहे. गृहयुद्धामुळे म्यानमारमधील अर्थव्यवस्थेत 18 टक्के घट झाली आहे, ज्यामुळे उपासमार आणि गरिबी वाढली आहे.

बर्मा हा एकेकाळी भारताचा भाग होता

1937 पूर्वी, ब्रिटिश सरकारने बर्माला भारताचे राज्य घोषित केले होते. नंतर ते वेगळे करून ब्रिटिश क्राउन कॉलनी बनवण्यात आली. 4 जानेवारी 1948 रोजी बर्माला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. 1962 पर्यंत लोकशाही सरकारांनी देशावर राज्य केले. 2 मार्च 19962 रोजी जनरल ने विन यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने बंड केले आणि सत्ता हस्तगत केली. हा ताबा 2011 पर्यंत टिकला. 1988 पर्यंत, म्यानमारमध्ये एक-पक्षीय व्यवस्था होती. लष्करी जनरल आलटून पालटून सत्तेचे प्रमुख होत राहिले. 1988 मध्ये पहिल्यांदाच सैन्य समर्थित बर्मा सोशलिस्ट प्रोग्राम पार्टीला आव्हान देण्यात आले. चालू मोठ्या प्रमाणात आंदोलनांदरम्यान लष्करी अधिकारी सॉ माउंग यांनी सत्ता हस्तगत केली आणि एक नवीन लष्करी परिषद स्थापन केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
Iran War: अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर, इराणवरुन ट्रम्प यांचा गोंधळात गोंधळ
अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर,ट्रम्प यांचं नेमकं काय सुरु?
Muhoozi Kainerugaba: '1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
'1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
Iran US War : आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला
आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget