एक्स्प्लोर
Special Report EXTORTION CASE : MLA Abhijit Patil यांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, पंढरपूरमध्ये सापळा
पंढरपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार Abhijit Patil यांच्या ताब्यात असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एका व्यक्तीने खंडणीची मागणी केली होती. राज घोडके नावाच्या तथाकथित कामगार नेत्याने आमदार पाटलांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. कारखान्याच्या काही जुन्या देण्यावरून घोडके आंदोलन करत होता आणि कामगार व व्यापाऱ्यांना उचकवण्याचे काम करत होता. आमदार पाटलांचे स्वीय सहायक नितीन सरडे यांनी त्याच्याशी चर्चा केली असता, त्याने थेट एक कोटी रुपये खंडणीची मागणी केली. "आरोपी किरणराज घोडके याने आमदार तसेच विठ्ठल कारखाना विरोधात काही बोलणार नाही म्हणून एक कोटीची खंडणी मागितली होती आणि अॅडव्हान्स स्वरुपात दहा लाखांची रक्कम स्वीकारताना त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे." अशी माहिती पोलिसांनी दिली. आमदारांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. दहा लाख रुपये अॅडव्हान्स देण्याचे ठरले. दहा जुलै रोजी शहरातल्या एका चौकात पैशाची बॅग घेण्यासाठी घोडके आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाढत चाललेल्या ब्लॅकमेलिंग आणि खंडणीखोरांच्या प्रकरणाला चाप बसणार आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर



















