Eng vs Ind 3rd Test Day 2 Stumps : लॉर्ड्सवर थरार शिगेला! बुमराहनं रंगत आणली, आता सामना पलटायचं काम केएल-पंतकडे, दुसऱ्या दिवशी काय घडलं?
Eng vs Ind 3rd Test Day 2 Stumps : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे.

England vs India 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारतीय संघाने फलंदाजीत 3 विकेट गमावून 145 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून खेळताना केएल राहुल 53 धावांवर आणि ऋषभ पंत 19 धावांवर नाबाद होते. अशाप्रकारे, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस यजमान इंग्लंडकडे 242 धावांची आघाडी आहे. भारताकडून बाद झालेले तीन फलंदाज म्हणजे यशस्वी जैस्वाल, करुण नायर आणि कर्णधार शुभमन गिल.
That’s stumps on Day 2!
— BCCI (@BCCI) July 11, 2025
KL Rahul and Vice-captain Rishabh Pant are in the middle 🤝 #TeamIndia trail by 242 runs in the first innings
Scorecard ▶️ https://t.co/omiZVl0Plb#ENGvIND pic.twitter.com/KU2IRcQO0Z
इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर संपला!
इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर संपला. त्यांच्यासाठी जो रूटने शतक तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने अर्धशतके झळकावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ चार विकेट गमावून 251 धावांवर संपवला. त्यावेळी जो रूट आणि बेन स्टोक्स खेळत होते. पण दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. बुमराहने पहिल्या सत्रात तीन विकेट घेतल्या. त्याने बेन स्टोक्स (44), जो रूट (104) आणि ख्रिस वोक्स (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
त्यानंतर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सने संघाची सूत्रे हाती घेतली. आठव्या विकेटसाठी दोघांमध्ये 80 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली, जी सिराजने मोडली. त्याने जेमी स्मिथची शिकार केली, जो 56 चेंडूत 51 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बुमराहने जोफ्रा आर्चरच्या रूपात इंग्लंडला नववा धक्का दिला. तो फक्त चार धावा करू शकला.
ब्रायडन कार्सचे अर्धशतक, जसप्रीत बुमराहचा पंजा!
भारताविरुद्धच्या पहिल्या डावात ब्रायडन कार्सने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 83 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. तो सिराजच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच तर मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.
Maiden five-wicket haul for Jasprit Bumrah at the Home of Cricket 👏#WTC27 | #ENGvIND 📝: https://t.co/0NCkPJe9tS pic.twitter.com/gPwBqjiu1n
— ICC (@ICC) July 11, 2025
हे ही वाचा -




















