Zero Hour Shinde Delhi Daura: शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण काय?दिल्लीत जाऊन शिंदेंनी गायलं गाऱ्हाणं?
Zero Hour Shinde Delhi Daura: शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण काय?दिल्लीत जाऊन शिंदेंनी गायलं गाऱ्हाणं?
राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat Video) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहेत. तर बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावरून ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की,गेले दोन-अडीच वर्ष 33 देशांमध्ये गद्दारीची नोंद घेण्यात आली. 50 खोके एकदम ओके, त्याच्यातील कदाचित एक आज खोका दिसला असेल. हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत. परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना दिसला. आज एक खोक्यांसोबत बसले आहेत. ते आता बदलून सांगतील की, तिथे महात्मा गांधी छापलेले बनियन होते, बाकी काही त्यात नव्हते. पण, स्पष्टपणे दिसत आहे. ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन बळकावण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे. पण, प्रश्न असा आहे की, या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंधे कारवाई करणार का? ते बिलकुल कारवाई करणार नाही. त्यांना आयटीची नोटीस आलेली आहे. ती खूप उशिरा आली आहे. पण, या आयटीच्या नोटीसीवर आता त्यांना क्लीन चीट मिळणार की खरोखर भाजप कारवाई करणार? हे बघावे लागेल, असा हल्लाबोल त्यांनी केला.






















