Radhika Yadav : राधिका यादवला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता,विदेशात जायचं होतं, प्रशिक्षकासोबत व्हाट्सअपवरील संभाषण समोर
Radhika Yadav Murder Case: राधिका यादवनं तिच्या प्रशिक्षकासोबत व्हाटसअप चॅटवर बोलताना कुटुंबापासून दूर जायचं होतं असं म्हटलं होतं. पोलिसांनी या घटनेतील ऑनर किलिंगचा अँगल फेटाळला आहे.

गुरुग्राम : येथील टेनिस खेळाडू राधिका यादव हत्या प्रकरणातील आरोपी वडिलांना न्यायालयानं एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे. या दरम्यान राधिका यादव आणि तिच्या प्रशिक्षकाच्या व्हाटसअप चॅटमधून हे समोर आलं आहे की तिला विदेशात जायचं होतं, कारण इथं तिच्यावर बंधनं होती. राधिकाचा एक म्युझिक व्हिडिओ समोर आला आहे जो दोन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता.
राधिका यादवला विदेशात जायचं होतं
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार राधिकानं व्हाटसअप चॅटवर प्रशिक्षकाशी बोलताना विदेशात जाण्यासंदर्भात चर्चा केली होती. तिनं प्रशिक्षकाला म्हटलं होतं, मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे, इथं खूप बंधनं आहेत, मला कुटुंबापासून दूर जायचं आहे. चॅटमधून हे दिसून येतं की राधिकाला दुबई किंवा ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. चीनमध्ये खाण्याचे पर्याय कमी असल्यानं चीनला जायला तिनं नकार दिला होता.
टेनिस अकॅडमीमुळं वाद?
पोलिसांच्या मते राधिका आणि तिचे वडील दीपक यादव यांच्यात टेनिस अकॅडमवीवरुन वाद होते, त्यातून तिची हत्या करण्यात आली. राधिकाच्या सोशल मीडियावरील रिल्सवरील गावकऱ्यांच्या कमेंटसमुळे ते दीपक यादव त्रस्त होते. राधिका यादव यूट्यूबर एल्विश यादव याच्या गावातील होतील. राधिकाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं होतं, मात्र गावातले लोक तिच्या वडिलांसमोर टीका करायचे.
पोलिसांनी ऑनर किलिंगचा अँगल फेटाळला
राधिका यादव हत्याकांडात गुरुग्राम पोलिसांच्या रिमांड पेपरच्या डिटेल्स अनुसार, हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आलं आहे. दीपक यादवच्या लायसन्स पिस्तुलासोबत काडतुसं जमिनीवर ठेवलेली आढळली. घरातून डीवीआर जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरुवारी राधिका आणि तिचे वडील दीपक यादव यांच्यात टेनिस अकॅडीवरुन वाद झाला होता.
राधिकाचा काका कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरुन या हत्ये प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील ऑनर किलिंगचा अँगल फेटाळला आहे. राधिका यादवची आई मंजू यादव हिनं या घटनांच्या कारणांबाबत कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.
























