Air Pollition : हवा बदलली, आरोग्य बिघडलं! पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावण्याची कारणं समोर
चांगल्या वातावरणासाठी ओळखल जाणाऱ्या पुणे शहराने दिल्ली आणि मुंबईला हवेच्या गुणवत्ताबाबत मागे टाकलं आहे. मुंबई आणि दिल्ली पेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळतंय.
पुणे : चांगल्या वातावरणासाठी ओळखल जाणाऱ्या पुणे शहराने दिल्ली आणि मुंबईला हवेच्या गुणवत्ताबाबत मागे टाकलं आहे. मुंबई आणि दिल्ली पेक्षा पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावल्याचं चित्र बघायला मिळतंय. विविध संस्थांच्या रिपोर्ट मधून हे चित्र समोर आलं आहे.
मुंबईपेक्षाही पुण्यातील हवा गुणवत्ता खालवल्याचं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असली तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थितीत असल्याचं अनेक संस्थांच्या अभ्यासातून बघायला मिळतंय.
सध्याच्या आकडेवारी किती आहे?
दिल्ली - 110
पुणे - 178
मुंबई - 146
नवी मुंबई - 152
लोहगाव - 301
आळंदी - 232
मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 वर, तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर होता. तर दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 110 वर होता. ही परिस्थिती बरी असली तरी हिवाळ्यात पूर्वेकडून वाहणारे वारे, सोबतच वाऱ्यांचा वेग देखील कमी असल्याने मुंबईसह पुण्यातील हवा गुणवत्ता एकंदरीत खालवली असल्याचं पर्यावरण अभ्यासक सुनील जोशी यांनी सांगितलं आहे.
मुंबई आणि पुण्यात पीएम 2.5 कणांची मात्रा अधिक असल्याची सफरची नोंद आहे. पीएम 2.5 धुलिकण कार्सिनोजेनिक असल्याने श्वसनासाठी घातक आहे. हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध रोग, दमा, टीबी, केंसर ,सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांच्या रुग्णांना त्रास वाढतो असे तज्ञांकडून सांगण्यात येतंय.
मुंबईतील वाहतूक व्यवस्था, सुरु असलेली बांधकामं, मेट्रोची कामं आणि धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. मुंबईसह पुण्याच्या हवेची गुणवत्ता देखील खालावत चालली आहे. पर्यावरणाशी निगडित अनेक कायदे असूनही त्यांचं पालन केलं जात नाही. पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये सुरू असलेले प्रकल्प, इथली वाहतूक व्यवस्था या सगळ्यामुळे प्रदूषणात भर पडतीय. हे प्रदूषण रोखण्याचं मोठे आव्हान प्रशासन आणि नागरिकांसमोर आहे.
प्रदूषित हवेसाठी वाहतूक जबाबदार
तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि कोरडे हवामान असते. या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात.
हे ही वाचा :