एक्स्प्लोर

Mumbai Pollution : मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, धुलीकणांचं प्रमाण अतिधोकादायक पातळीवर

मुंबईत पावसाळ्यात धूळ कमी प्रमाणात उडते त्यामुळे हवा बऱ्यापैकी चांगली असते. पण ऑक्टोबरमध्ये मुंबईतल्या हवेची गुणवत्ता मॉडरेट श्रेणीत दिसत आहे

मुंबई:  मुंबईत पावसाळ्यात हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution)  चांगल्या श्रेणीत होती.  मान्सून (Monsoon Withdrawl) परतल्यानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे वाढत्या ऑक्टोबर हिटसोबत (October Heat) मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

 देशातल्या काही महत्वांच्या शहरांच्या हवेच्या गुणवत्तेसंदर्भात 2019 ते 2023 अशी चार वर्ष अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान हवेची गुणवत्ता खालावत असल्याचं दिसून आलंय. दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ, पाटणा, मुंबई अशा मोठा शहरांमध्ये प्रदुषण वाढून हवा दूषीत होत असल्याचं जाणवलं आहे. मुंबईत पावसाळ्यात धूळ कमी प्रमाणात उडते त्यामुळे हवा बऱ्यापैकी चांगली असते. पण ऑक्टोबरनंतर मुंबईतल्या हवेची गुणवत्ता मॉडरेट श्रेणीत दिसत आहे. दिल्ली आणि पाटण्यातही हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याचं दिसून आलंय. 

धुलीकणांचं प्रमाण अतिधोकादायक पातळीवर

सफर या संस्थेच्या नोंदींनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून वाईट श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक धूलीकणांचे प्रमाण वाढले आहे.  पार्ल्यात सोमवारी संध्याकाळी अतिधोकादायक हवेची नोंद झाली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 318 नोंदवला गेला. या हवेत घराबाहेर पडणंही धोकादायक ठरू शकतं. या शिवाय माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, परळ, मुलुंड या परिसरातील हवा अतिवाईट श्रेणीत असल्याची नोंद  झाली. मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. सतत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. दोन्ही बाजूंनी समान वारे वाहत असल्याने मुंबई आणि नवी मुंबईला प्रदुषणाचा विळखा बसलेला आहे. वाढत्या विकासकामांमुळे हवेत धूळ उडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. 

अशा प्रकारे स्वतःचे रक्षण करा.

  • व्यायाम करा.
  • सकाळी घराबाहेर पडू नका.
  • जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • रोज सकाळी योगा करा.
  • जास्त प्रदूषण असेल तर मास्क लावूनच बाहेर पडा

काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे मुंबई आणि परिसरातील लोकांना श्वसनाचे विकार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं असून, हे प्रदूषण रोखण्याचं आव्हानही समोर उभं ठाकलंय.  

हे ही वाचा :                        

Health Tips : गरोदर असून मोकळ्या हवेत फिरत आहात, तर थांबा, वायू प्रदूषणाचा धोका वाढतोय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget