एक्स्प्लोर
पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये: प्रतिभाताई पाटील

पुणे: ‘शरद पवारांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये’, असा खास सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत तयार केलेल्या महिला धोरणाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला धोरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना राजकारणाची दारं उघडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यावेळी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारांचा सन्मान करण्यात आला. ‘शरद पवार यांचं नाव सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहे आणि ते त्यासाठी नाही म्हणत आहेत. हे मला माहिती आहे. पण त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये. असं मला त्यांना सांगायचं आहे.’ असं म्हणत प्रतिभाताई पाटलांनी एकप्रकारे पवारांच्या नावाला आपली पसंती असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘महिला धोरण आणायची दूरदृष्टी आणि विचार हा खूप कमी नेते दाखवतात, पवार हे त्यापैकीच एक आहेत.’ असंही प्रतिभाताई यावेळी म्हणाल्या. संबंधित बातम्या:
विरोधकांची महायुती, शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?
शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाहीत : राष्ट्रवादी
राष्ट्रपती व्हायचं असेल, तर पवारांनी एनडीएत यावं: आठवले
राष्ट्रपती निवडणुकीची खलबतं, सोनिया गांधींनी बोलावली देशभरातील 17 विरोधी पक्षांची बैठक
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























