पुणेकरांना दिलासा! प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा 10 रुपये
पुणे : रेल्वे प्रवास करणाऱ्या पुणेकरांना (Pune) दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) मंगळवारपासून पुन्हा 10 रुपये करण्यात आलं आहे.
पुणे : रेल्वे प्रवास करणाऱ्या पुणेकरांना (Pune) दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट (Platform Ticket) मंगळवारपासून पुन्हा 10 रुपये करण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्याा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्ले स्थानकावरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आले होते. हे नवे दर 17 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, आजपासून पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपये करण्यात आलं आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्लॅटफॉर्म तिकीटाच्या (Platform Ticket) वाढलेल्या दरामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रासााल सामोरे जावे लागत होते. तिकीट खिडक्यांची संख्या मोजकी असल्यामुळे तिकीटासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले. यामुळे प्रशासनाने पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीटाची मूळ रक्कम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या पुणे शहरातील कोविड संसर्गाचे (Covid19) प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे रेल्वे विभागाने रेल्वे स्थानक आणि आवारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयाचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किमत पुन्हा पूर्वीप्रमाणे 10 रुपये करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
- Black Fungus : चिंताजनक! पुन्हा म्यूकरमायकोसिसचा धोका, मुंबईत आढळला पहिला रुग्ण; 'ही' आहेत लक्षणे
- Budget 2022: काय स्वस्त होणार, काय महागणार? अर्थसंकल्पाकडे असणार सामान्यांचे लक्ष
- Budget 2022: आयकरात सवलत मिळणार का, शेतकऱ्यांसाठी खास घोषणा? अर्थसंकल्पापूर्वी जाणून घ्या 15 महत्त्वाच्या गोष्टी
- Union Budget 2022 : यंदाचं बजेटही 'डिजिटल'; सीतारमण यांचं भाषण किती वेळाचं असणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha