एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Case: जालिंदर सुपेकरांसह पत्नीला सहआरोपी करा; वैष्णवी हगवणेच्या रूखवताच्या नावाखाली दीड लाख रूपये घेतल्याची माहिती, अहवालात नेमकं काय म्हटलंय?

Vaishnavi Hagawane Case: सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्या दृष्टीने तपास करून सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

Vaishnavi Hagawane Case:  गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणाचा अहवाल आता समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Case) प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असण्याची व कस्पटे कुटुंबीयांनी त्याबाबत आरोप केल्यानंतर पोलिसांनी या दिशेने स्वतःहून तपास करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांच्या स्तरावरून अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक, गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे विधिमंडळाच्या महिला बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.(Vaishnavi Hagawane Case) 

दरम्यान, आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की,  हगवणे कुटूंबाचे नातेवाईक असलेले आयजी सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. मात्र, हा अहवाल विधानसभेत सादर होईपर्यंत कोणतीही माहिती समितीला दिली गेली नाही. हा समितीचा अवमान आहे. याची गृह विभागाने गंभीर दखल घ्यावी आणि अशा दिरंगाईसाठी दोषी असलेल्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, जालिंदर सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप माध्यमांमध्ये आलेली होती. या क्लिपची तपासणी करावी. सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्या दृष्टीने तपास करून सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

अहवालात नेमकं काय-काय म्हटलंय?

या प्रकरणी हगवणे कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन आय.जी.जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप देखील तपासादरम्यान समोर आला आहे. इतकेच नव्हेतर वैष्णवी हगवणेच्या लग्नात रुखवताच्या नावाखाली सुपेकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यात एक लाख रुपये तसेच रोखीने पन्नास हजार असे एकूण दीड लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे पुरावे देखील विभागाकडे प्राप्त झालेले आहेत. तसेच कस्पटे कुटुंबियांनी देखील ही बाब पोलीस जबाबात नोंदविलेली असून प्रसार माध्यमांसमोर देखील सांगितलेली आहे. इतकेच नव्हेतर कस्पटे (वैष्णवीचे आई-वडील) कुटुंबियांनी या प्रकरणात आयजी सुपेकर यांनी पदाचा गैरवापर करून त्या माध्यमातून सदर प्रकरणी दबाव आणून आरोपींना मदत करण्यात येत असल्याचे स्टेटमेंट पोलिसांना दिलेले आहे.

 हगवणे कुटुंबातील निकटवर्तीय पोलीस विभागात वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची पूर्ण शक्यता लक्षात घेता, या प्रकरणाच्या तपासापासून अशा सर्व व्यक्तींना दूर ठेवण्यात यावे. तसेच त्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव, दबाव व हस्तक्षेप या तपासावर होणार नाही याची पुर्ण दक्षता विभागाने घ्यावी. सुपेकर हे पदाचा गैरवापर करून या प्रकरणी दबाव आणण्याची पुर्ण शक्यता आहे. त्याआधारे त्यांचा या प्रकरणातील सहभागाबाबत सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे त्यादरम्यान जालिंदर सुपेकर यांची एक ऑडीओ क्लीप माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली. या ऑडीओ क्लीपची फॉरेन्सीक विभागाकडून सखोल तपासणी करून याची सत्यता पडताळून पहावी.

यात वस्तुस्थिती आढळल्यास जालिंदर सुपेकर यांना निलंबित करून त्यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणी सहआरोपी करण्यात यावे. तसेच जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यादृष्टीने तपास करून जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीला या प्रकरणात सहआरोपी करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व यासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती समितीस तात्काळ देण्यात यावी अशीही समितीची शिफारस आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lata Asha Hospital : लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा
लता मंगेशकर हॉस्पिटलचं नाव बदलणार, आशा भोसलेंच्या नावाचाही समावेश, हृदयनाथ मंगेशकरांची मोठी घोषणा
Pune Crime News: पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..
पुण्यातील महिला पतीपासून वेगळी राहायची; तोडगा काढण्याचं भासवत भोंदूबाबानंच केलं धक्कादायक कांड, शेवटी..
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
पिंपरी-चिंचवडमध्ये पीएचडीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शास्त्रज्ञ प्राध्यापकाकडून छळ, मित्र धावत गेला पण....
Baramati Election Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget