एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात धुळवडीच्या उत्साहाला गालबोट, चतुःशृंगी परिसरात रंग खेळताना दोन गटात राडा
चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही काही कारणास्तव भांडण झालं. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही. मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पुणे : पुण्यात धुळवडीला रंग खेळताना दोन गटात झालेल्या वादावादीतून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैरेवाडी येथे आज सकाळी ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यात काही तरुण एकमेकांचा पाठलाग करताना दगडफेक करताना दिसत आहेत. आज सकाळी ही घटना घडली. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सीसीटीव्हीमध्ये सुरवातीला एका गटातील काही तरुण दगडफेक करताना दिसत आहेत. यामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या काही दुचाकींचे नुकसानही झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातील काही तरुण लाठ्याकाठ्या घेऊन या तरुणांचा पाठलाग करताना दिसत आहे. चतु:शृंगी पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे तपास सुरू आहे.
चतुःशृंगी परिसरात दोन गटांमध्ये धुळवड खेळत असताना काही काही कारणास्तव भांडण झालं. नेमकं कोणत्या गोष्टीवरुन हे भांडण झालं हे कारण समजू शकलं नाही. मात्र यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांचं पतीसोबत आदिवासी कोरकू नृत्य | ABP Majha
सीसीटीव्हीत तरुणांचा एक गट दगडफेक करत असल्याचं दिसत आहे. तसंच रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोडही करत आहेत. यानंतर समोरील गटातील तरुण हातात काठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करताना दिसत आहेत. चतुःशृंगी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पण या प्रकारामुळे परिसरात भीतीचं आणि तणावचं वातावरण आहे.
कोरोनाचा होळी सणावर परिणाम होत असल्याचं एकीकडे सांगितलं जात असलं तरी तिकडे धुळ्यात होळी , धुळवड साजरी करतांना कोरोनाचा कुठलाच परिणाम नसल्याचं दिसलं . कोरोनाच्या धास्तीने होळी , धुळवड सण साजरा करतांना तरुणाई मधील उत्साह तसू भरही कमी झालेला नव्हता . तरुणाईने डीजे च्या तालावर थिरकत धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला.
संबंधित बातम्या :
राज्यभरात होळीनंतर धुळवडीचा उत्साह; खासदार नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी कोरकू नृत्य
बीडच्या विडा गावातील अनोखी प्रथा, धुलिवंदनाला जावयाची गाढवावरुन मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
Advertisement