एक्स्प्लोर

Baramati News : बारामतीमधील सोमेश्वर कॉलेजला शरद पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचा आक्षेप

Baramati News : सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला शरद पवारांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे.

Baramati News : पुण्याच्या (Pune) बारामतीमधील (Baramati) सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव दिल्याने सतीश काकडे यांनी आक्षेप घेतला आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला शरद पवार यांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे (Satish Kakade) यांनी आक्षेप घेतला आहे. कॉलेजला शरद पवार यांचे दिलेले नाव काढावे अशी मागणी सतीश काकडे यांनी केली आहे. 

सभासदांना विश्वासात न घेता शरद पवारांचं नावं दिलं : सतीश काकडे 
शरद पवार यांचे नाव द्यायला आमचा विरोध नाही. परंतु ते नाव देताना कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सतीश काकडे यांनी केला आहे. संचालक मंडळाने नामांतराचा विषय कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडायला हवा होता. परंतु संचालक मंडळाने जनरल बॉडीत हा निर्णय 2019 साली घेतला आणि हे शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये कळलं, असे सतीश काकडे यांचे म्हणणे आहे. पवार कुटुंबियांचा कारखान्याशी काहीही संबंध नसताना त्यांचं नाव कॉलेजला का द्यायचं, असा सवाल देखील काकडे यांनी विचारला आहे. 

ट्रस्टच्या माध्यमातून पैसे दिल्याने शरद पवार यांचं नाव
शरद पवार यांनी पवार ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संस्थेला तीन कोटी रुपये दिल्याने त्यांचं नाव देण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शिक्षण निधी म्हणून जवळपास 70 ते 75 कोटी रुपये निधी घेतला आहे. शरद पवारांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोटी रुपये दिले म्हणून त्यांचं नाव द्यायचं का असा सवाल काकडे यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांचे कॉलेजला दिलेले नाव काढावे, अशी मागणी काकडे यांनी केली. "हे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळप्रसंगी मंत्रिमंडळात हा विषय नेणार आहे. जर कुठेही न्याय मिळाला नाही, दिलेले नाव काढले नाहीतर नाईलाजाने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असे काकडे यांनी सांगितले. तसेच आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वास देखील सतीश काकडे यांनी व्यक्त केला. 

याविषयी कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना विचारणा केली असता संचालक मंडळाने नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याला आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं म्हटलं आहे. 

इतर महत्त्वाची बातमी

Raju Shetti : मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Beed : मनोज जरांगेंच्या समर्थनात आज बीड बंदची हाक : गंगाधर काळकुटेManoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईनJalna Kreat Competition : इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, 200 महाविद्यालयांचा समावेशManoj Jarange Jalna : वडीगोद्री येथील बॅरिकेड्स 15 मिनिटात काढा, जरांगे का संतापले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Embed widget