Raju Shetti : मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरुन राजू शेट्टींचा शरद पवारांना टोला
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एकदा मोर्चा काढला पाहिजे. त्यांना काय संशोधन केलं ते विचारलं पाहिजे, असे म्हणत स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.
Raju Shetti : पोरगा कारखाना चालवणार आणि बाप त्याचे पर्यवेक्षण करणार मग पर्यवेक्षण कसं नीट होईल. हे म्हणजे मुलगा पेपर लिहिणार आणि बाप पेपर तपासणार असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एकदा मोर्चा काढायला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की नेमकं काय संशोधन केले आहे, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
कारखान्यांकडं शिल्लक राहिलेल्या पैशांचा हिशोब मागणं गरजेचं
यावर्षी अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉलचं उत्पादन केलं आहे. यावेळी राजू शेट्टींनी आकडेवारी वाचून दाखवली. शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील कारखान्यांकडे अतिरीक्त ज्यादाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. दौंड शुगर कारखान्याकडे अतिरीक्त 43 कोटी रुपये, भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याकडे 51 कोटी रुपये अतिरीक्त आहेत, तसेच कर्मवीर कारखाना इंदापूर 40 कोटी, बारामती अॅग्रोकडे 116 कोटी रुपये आणि नीरा भिमा कारखान्याकडे 30 कोटी अतिरीक्त राहिल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. या शिल्लक राहिलेल्या पैशांचा हिशोब मागणं गरजेचं असल्याचे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. हा हिशोब माहगितला नाहीतर असेच राहणार आहे. ही आकडेवारी मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ऑडीटनुसार दिली असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. पण प्रत्यक्षात नेमकं काय असेल ते मला माहित नाही असेही शेट्टी म्हणाले.
बाप हेटमास्तर आणि पोरगा परिक्षेला
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या संशोधनाच्या मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत. इथं बाप हेडमास्तर आणि पोरगा परिक्षेला बसणार. पेपर बाप तापसणार मग निकाल काय लागणार असेही शेट्टी यावेळी म्हणाले. ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्याचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का? असा सवाल शेट्टींनी केला आहे. इथं सुद्धा ज्याच्या त्याच्या सोयीनं हिशोब व्हायला लागला तर महाराष्ट्रातील साखर उद्योगांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाली कोण राहणार? असेही शेट्टी यावेळी म्हणाले. म्हणून हे जर मोडून काढायचं असेल तर पुन्हा नव्यानं संघर्षाला सुरुवात करावा लागेल. आपण जर आता संघर्ष नाही केला तर काळ आपल्याला माफ करणार नाही असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Raju Shetti : मुकादम व्यवस्था संपवा, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, राजू शेट्टींची मागणी, 17 आणि 18 नोव्हेंबरला ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा