(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunetra Pawar baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर? परिचय पत्रकात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा उल्लेख
बारामतीत सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली का? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण सुनेत्रा पवारांचं प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय
पुणे : राज्यात लोकसभेच्या जागावाटपाची (Maharashtra Mahayuti Seat Sharing) चर्चा सुरु आहे. यात अजित पवार गटाला चार जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच बारामतीचंदेखील नाव आहे. बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवाराच्या (Sunetra Pawar) नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यातच बारामतीत (Baramati Loksabha 2024 ) सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर केली का? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण सुनेत्रा पवारांचं प्रचार परिचय पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. परिचय पत्रकावर सुनेत्रा पवारांचा फोटो आहे. तसंच वहिनी, तुम्ही हे केलं पण सांगितलं नाही, असा उल्लेखही आहे.
बारामती लोकसभा निवडणूकीचा महायुतीचा उमेदवार अजून निश्चित व्हायचा आहे. बारामतीत अजित पवार गटाच्या उमेदवार असणार आहे. अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच बारामतीत या निवडणुकीसाठी तयारीदेखील सुरु झाली आहे. सुनेत्रा पवारांनी विविध विकासकामांना आणि गावांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे. अनेक गावात जाऊन सुनेत्रा पवार नागरिकांच्या भेटी घेत आहेत. त्यानंतर आता थेट परिचय पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
यापूर्वी सुनेत्रा पवारांचा विकास रथ समोर आणला होता. या रथामधून सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाची माहिती दिली जात होती. संपूर्ण बारामती शहरात हा विकासरथ फिरत होता. त्यानंतर बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. तसं पत्र ही वरिष्ठांकडे पाठवण्यात आलं होतं. हे सगळं सुरु असतानाच अनेक कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करुन आणि सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून उमेदवारी जाहीर केली होती.
उमेदवारी कधी जाहीर होणार?, यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नसली तरी बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना भावी खासदार म्हणून घोषित केलं असल्याचं दिसत आहे. आता सुनेत्रा पवारांचं परिचय पत्र समोर आलं आहे. यात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबतच आम्ही दोघं एकत्र काम करु आणि बारामतीचा विकास करु, असं सुतोवाच सुनेत्रा पवारांनी केलं होतं. त्यामुळे फक्त उमेदवारी घोषित होण्याची प्रतिक्षा आहे. उमेदवारी घोषित झाल्यावर बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे.
इतर महत्वाची बातमी-