एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? तरुणीला मारहाण केली, कपडे फाडले अन्...; सात जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime news : सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील  वानवडी येथील केदारीनगर येथे हा प्रकार घडला आहे.

Pune Crime News : पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर  (Pune Crime news)  आला आहे. सोसायटीच्या कॉमन एरिया वापरण्याच्या कारणावरुन एका तरुणीला मारहाण करुन तिच्या अंगावरील कपडे फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील  वानवडी येथील केदारीनगर येथे हा प्रकार घडला आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात हा प्रकार घडल्याने सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नेमकं काय घडलं?

आरोपी आणि मुलगी हे दोघेही एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे या सगळ्यांमध्ये ओळखी होती. टेरेसवर मुलगी फिरत होती. त्यावेळी मुलांनी या मुलीला सोसायटीचा कॉमन परिसर वापरण्यास मनाई केली. याच कारणावरुन मुलीला शिवीगाळ केली आणि तिला हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने थेट या मुलीच्या अंगावरचे कपडे फाडले आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या फोनचंदेखील चांगलंच नुकसान केलं आहे.  याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल आहे. 


हा सगळा प्रकार पाहून या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   प्रीत कौर, क्रिस्टोफर जॉन बॉस्को, श्वेता उमेश शेट्टी, गजेंद्र सिंग गोविंदसिंग, सचिन कदम, जयेश गिरीश माली व एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. आजच एका गुन्ह्यात शारिरीक संबंध ठेवण्याला नकार दिल्याने तरुणीचा  मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 19 तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन प्रथमेश गुळवे याच्यावर आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी आणि  प्रथमेश गुळवे यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्री वाढली. इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर तरुणाने एकतर्फी प्रेमातून या प्रथमेश गुळवे याने अप्रत्यक्षरित्या तरुणीकडे शरिरसुखाची मागणी केली. आरोपीने फिर्यादीला कात्रज चौकात बोलावून शारीरिक सुखाची मागणी मागणी केली. त्यावेळी तिने त्याला विरोध केला असता आरोपीने तरुणीचा मॉर्फ केलेला अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअॅप वर व्हायरल केला. यामुळे तरुणीच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होऊन आरोपीने तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime news : तडीपार आरोपी शहरात शिरला अन् मी इथला भाई म्हणत दाखवले कोयते; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेकYuva Sena Win Senate Election :सिनेटमध्ये दस का दम; मातोश्रीवर 'शत प्रतिशत' विजयोत्सव Special ReportAmruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget