Yuva Sena Win Senate Election :सिनेटमध्ये दस का दम; मातोश्रीवर 'शत प्रतिशत' विजयोत्सव Special Report
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १० उमेदवार निवडून आलेत.. या विजयानंतर मातोश्रीवर एकच जल्लोष करण्यात आला.. विजयोत्सव साजरा करतानाच आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. ही तर सुरुवात आहे विधानसभेतही विजयाचा असाच गुलाल उधळायचा असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला..युवासेनेने मातोश्रीवर विजयोत्सव साजरा केला पाहूया.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सिनेटची निवडणूक
अखेर पार पडली
ज्यात युवासेनेचा दणदणीत विजय झालाय
सर्वच्या सर्व दहा उमेदवारांनी
मातोश्रीवर जाऊन जल्लोष साजरा केला...
उद्धव ठाकरेंनी विजयी शिलेदारांसोबत जल्लोष केला...
आदित्य, तेजस ठाकरेंनीही गुलालाची उधळण केली...
रश्मी ठाकरेंनीही तर आदित्य ठाकरेंनी आईला गुलाल लावून
मिठी मारत आनंद व्यक्त केला...
सिनेटच्या निवडणुकीतील हा विजय सुरुवात आहे
विधानसभेतही असाच विजयाचा गुलाल उधळू
असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलाय.
तर सिनेटचं मतदान ईव्हीएमवर होत नसल्याने
त्याचा निकाल हा पारदर्शक असतो असा टोला संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना हाणलाय
खरं तर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत
त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत.
लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत चांगलं यश मिळालंय...
आता सिनेटच्या निमित्तानं मुंबई विद्यापीठात ठाकरेंचा आवाज घुमलाय...
मुंबईनंतर आता ठाकरे विधानसभाही काबीज करणार का, ते पाहायचं आहे...