एक्स्प्लोर
Pune Metro line inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून मेट्रोचं उद्घाटन करण्याआधी 'मविआ'चा राडा, घोषणाबाजी अन्..
Pune Metro line inauguration: मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे.
Pune Metro line inauguration
1/5

मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे.
2/5

रविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार आहे, मात्र याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ( ठाकरे गट ) शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाबाहेर भर पावसात आंदोलन केलं आहे.
Published at : 27 Sep 2024 04:32 PM (IST)
आणखी पाहा























