एक्स्प्लोर
Advertisement
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी द्या : प्रकाश आंबेडकर
इंदूमिलमधील स्मारकाची उंची वाढवून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रकाश आंबेडकरांनी नापसंती दर्शवली आहे. हा निधी आर्थिक संकटात सापडलेल्या वाडिया रूग्णालयासाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई : पुतळ्याची उंची वाढवायला पैसा आहे आणि वाडिया हॉस्पिटलला नाही या न्यायालयाच्या भूमिकेचं स्वागत करतो. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक वादात आहे. तिथे पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दिक विचार केंद्र निर्माण व्हावं अस माझं मत आहे. तिथे पुतळा उभारण्यासाठी जो निधी मंजूर केलाय तो वाडियासाठी वर्ग करावा अशी माझी कोर्टाला विनंती आहे. पुतळा नंतर उभारता येऊ शकतो, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ही जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. मात्र इथल्या राजकारण्यांनी ही जागा पुतळ्यासाठी वापरली. त्यामुळे न्यायालयाला मी विनंती करतो की, त्यांनी पुतळ्याचा आणि सुशोभीकरणाचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचा आदेश द्यावा.
महाराष्ट्र बंदची हाक
ते पुढे म्हणाले की, देशात घातक परिस्थिती आहे. अराजकता माजेल अशी स्थिती आहे. त्याला आरएसएस, भाजप कारणीभूत आहे. देशात लोकशाही दिसत नाही, हिटलरशाही दिसते. NRC संदर्भात येत असलेल्या बातम्यांमधून हा दशतवाद निर्माण झालाय. NRC, CAA आणि NPR च्या माध्यमातून असंविधनिक आणि आरएसएसला अपेक्षित काम सरकारकडून सुरू आहे, असे ते म्हणाले. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात 24 तारखेला प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये ३५ संघटना सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हे सरकार दारुड्यासारखे सरकार
ते पुढे म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे. देश चालवण्यासाठी पैसा नाही. 3 लक्ष कोटीची तूट आहे. हे सरकार दारुड्यासारखे सरकार आहे, त्यानं एक एक गोष्ट विकायला काढली आहे. 9 हजार कोटींची नफा देणारी भारत पेट्रोलियम विकायला काढली आहे. त्यामुळे सरकार सोन्याच अंडं देणारी कोंबडी कापायला निघालंय, असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या
वाडियाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा, चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
स्मारकांची उंची वाढवण्यासाठी पैसे आहेत, मात्र रुग्णालयासाठी नाही; 'वाडिया'वरुन हायकोर्टाने
वाडिया प्रश्नावर तोडगा निघाला, रुग्णालय प्रशासनाला 46 कोटी मिळणार
Sharmila Thackeray | वाडिया हॉस्पिटलप्रकरणी अजित पवारांना भेटण्यासाठी शर्मिला ठाकरे मंत्रालयात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement