एक्स्प्लोर

Heat Alert: थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यासह सोलापूर तापलं, प्रशासनाकडून अलर्ट

Heat Alert: पुणेकरांनी बारा ते चार या वेळात बाहेर फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पुणे शहरात उन्हाचा तडाखा (Heat Alert) वाढला आहे. शहराचा पारा 32 वरून 36 अंशावर पोहोचला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाने 36 अंशाचा आकडा गाठला आहे. हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान (Heat Alert) आहे. येत्या काही दिवसात तापमान 40° जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणेकरांनी बारा ते चार या वेळात बाहेर फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.(Heat Alert)

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वाढत्या उन्हामुळे आणि तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढतो आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि लिंबू सरबत, ताक यांसारख्या पेयांचे सेवन करा. बाहेर पडताना सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.(Heat Alert)

मार्चच्या सुरुवातीलाच सोलापूरकर घामाघूम...

फेब्रुवारी महिना सरताच सोलापूरच्या तापमानाने आता चांगलीच उसळी घेतली आहे. काल मंगळवारी, ३ मार्च रोजी सोलापूर शहरात हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, कमाल तापमान ३८.०° सेल्सिअस (१००.४° फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांतच उन्हाने आपला इंगा दाखवायला सुरुवात केल्याने सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत.
   
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. हवेतील आर्द्रता ३४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे. किमान तापमानही २२.९°C वर पोहोचल्याने आता रात्रीच्या वेळीही गारवा कमी होऊन उकाडा जाणवू लागला आहे. ​तापमानात अचानक वाढ झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाहेर पडताना सुती कपड्यांचा वापर करावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे.पुढील अंदाज: येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून, उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

कोकणात दमट हवामान

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी हवेतील आर्द्रता वाढल्याने अस्वस्थता अधिक जाणवेल. मुंबईचे तापमान कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस आणि किमान २४ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागांत दमट हवामान असेल आणि उन वाढल्याने उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget