एक्स्प्लोर

वाडिया प्रश्नावर तोडगा निघाला, रुग्णालय प्रशासनाला 46 कोटी मिळणार

मुंबई महापालिका प्रशासनाने आजच्या आज अनुदान देण्याचं मान्य केले आहे. वाडिया प्रशासन 135 कोटी महापालिकेकडे बाकी आहेत म्हणत होतं. मात्र महापालिका प्रशासनाने हे फेटाळले असून फक्त 21 ते 22 कोटी बाकी असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वाडिया रुग्णालय प्रकरणावर अखेर तोडगा निघाला आहे. वाडिया रुग्णालयाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 46 कोटींचं अनुदान देण्यात येणार आहे. महापालिकेकडून 22 कोटी तर राज्य सरकारकडून 24 कोटी रुग्णालयाला देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन मध्यस्थी केल्याने हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि वाडियाचे ट्रस्टी यांच्यात झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे. नस्ली वाडिया हे देखील या बैठकीस उपस्थित होते. त्याचसोबत वाडिया रुग्णालयाच्या प्रशासनावर जे अनियमिततेचे आरोप झाले आहेत, त्याबाबत अहवाल सादर करुन पुन्हा चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या 10 दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील, तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

वाडियाबाबत दळभद्री राजकारण होऊ नये. वाडिया वाचवणार हे सांगितलं  होतं, वाडिया वाचवलं. महापालिकेचे 22 कोटी आणि राज्य शासनाचे 24 कोटी मिळून 46 कोटी अनुदान वाडियाला मिळणार. जी अनियमितता वाडियात आढळली आहे, त्याबाबत अहवाल सादर होईल, पुर्नचौकशी होईल. एक समिती वाडियातील अनियमीततेबाबत चौकशी करेल. येत्या 8 दिवसांत वाडिया प्रशासनाला अपेक्षित निधीची रक्कम देणे योग्य आहे का हे ठरवले जाईल.

वाडिया प्रश्नावर पूर्ण तोडगा निघाला नाही

वाडिया प्रश्नावर पूर्ण तोडगा निघालाय असं आम्ही म्हणणार नाही. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराची रक्कम देण्यासाठी 110 कोटी लागतील, तेवढा निधी दिला गेलेला नाही. आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत युनियनला निमंत्रणच नव्हतं. आमचे प्रश्न मांडले गेलेच नाहीत. गरज पडली तर भविष्यात पुन्हा आंदोलन करु, असा इशारा वाडिया हॉस्पिटल युनियनचे सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget