एक्स्प्लोर

वाडियाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा, चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

निधी अभावी वाडिया रुग्णालय चालवणं प्रशासनाला अवघड जात असून हे रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिकेनं या रुग्णालयासाठी 14 कोटी तर राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असला तरी हे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत.

मुंबई : वाडियाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. या संदर्भात अनुदान रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ही जागा प्राईम लोकेशनवर असल्यामुळे यावर अधिकाऱ्यांचा डोळा. यामध्ये तथ्य असून भूखंड हडपण्यासाठी काही बैठका झाल्या का? अनुदान मुद्दाम उशीरा दिलं का? याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना दरेकर म्हणाले की, अनुदानाचं निमित्त दाखवून, मोठा मलिदा खाऊन, भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार काही अधिकाऱ्यांचा आहे का? अशी मला शंका आहे. महापालिकेनं अजून अनुदान दिलं नाहीये. त्यामुळे जे संबंधित अधिकारी आहेत त्यात फायनन्स विभागापासून ते सर्व वरिष्ठांपर्यंत चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अधिकारी कोण आहेत हे येणाऱ्या काळात कळेल. अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या तर हे स्पष्ट होईल की यामध्ये काही काळंबेरं आहे. ही नफा कमवायची लाईन आहे. त्यामुळे यांसदर्भात चौकशी झाली पाहिजे, असे दरेकर म्हणाले. स्मारकांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे मात्र, रुग्णालयासाठी नाहीत, हायकोर्टाने झापलं स्मारकांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत. मात्र, रुग्णालयाच्या ट्रस्टला देण्यासाठी नाहीत. या शब्दांत गुरुवारी वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरुन हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसेच येत्या 24 तासांत वाडिया हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध न झाल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांची कोर्टात परेड घेऊ, असं हायकोर्टानं संबंधित वकिलांना सुनावलं. त्यावर संबंधित निधी ताताडीनं उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली आहे. नवं सरकार तरी वाडिया रुग्णालयाला निधी देणार आहे की नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला गेल्या सुनावणीत विचारला होता. निधी अभावी वाडिया रुग्णालय चालवणं प्रशासनाला अवघड जात असून हे रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिकेनं या रुग्णालयासाठी 14 कोटी तर राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असला तरी हे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. वाडिया हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, नवीन रुग्ण भर्ती थांबवली अख्खं लालबाग परळ जिथं जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल सध्या व्हेंटिलेटरवर आहे. वाडिया हॉस्पिटल प्रशासनानं निधी अभावी नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवली आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर मॅटर्निटी डिपार्टमेंटमधील 100 पेशंट घरी पाठवले आहेत. वाडिया हॉस्पिटलमध्ये सध्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट, हृदयरोग, मूत्रपिंड इत्यादी सर्व शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे 30 कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे 105 कोटी असे सुमारे 135 कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासूनच्या थकीत रकमेपैकी केवळ 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 1 April 2026: एप्रिलचा पहिलाच दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! 12 राशींसाठी कसा असेल दिवस? श्रीगणेशाचा आशीर्वाद, आजचे राशीभविष्य
एप्रिलचा पहिलाच दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! 12 राशींसाठी कसा असेल दिवस? श्रीगणेशाचा आशीर्वाद, आजचे राशीभविष्य
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, फडणवीस सरकारचा बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा
PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget