'भाजपच्या घरात शिरला की डाग पुसले जातात', विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांसह भाजपला टोला, म्हणाले..
Vijay Wadettiwar: भाजपचं घर असं बनलंय जिथे एन्ट्री मिळताच माणूस स्वच्छ होऊन बाहेर पडतो . असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला.
Vijay Wadettiwar on Ajit PAwar:भाजपच्या घरात शिरला की डाग पुसले जातात . यात नवल वाटण्यासारखं काही नाही . घरात आरोप करायचे व्यवस्था आहे तशीच त्यातून मुक्त करायची ही व्यवस्था आहे . महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने दिलासा दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांसह भाजपवर जोरदार टीका केलीये .
भाजपचं घर असं बनलंय जिथे एन्ट्री मिळताच माणूस स्वच्छ होऊन बाहेर पडतो . भाजपच्या घरात गेल्यावर माणूस स्वच्छ होतो . मात्र घराच्या बाहेर पडला की तो चिखलाने मागतो .यात नवल वाटण्यासारखं काही नाही .असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भाजपला टोला लगावलाय .
भाजपचं घर आपल्यावर लागलेले डाग धुण्यासाठीच : विजय वडेट्टीवार
'जे लोक तुमच्यासोबत राहत नाहीत ते घाणेरडे दिसतात पण सोबत येणाऱ्यांचे डाग पुसले जातात .केवळ आपल्यावर लागलेले डाग धुण्यासाठी भाजप असल्याचा लोकांचा समज झाला असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला . ते म्हणाले, घरात गेल्यावर माणूस स्वच्छ होतो.मात्र घराच्या बाहेर गेला की तो चिखलाने माखतो. घरात आरोप करायची व्यवस्था आहे आणि त्यातून मुक्त करायची देखील व्यवस्था आहे. त्यामुळे नवल वाटण्यासारखं काही नाही. दरम्यान, EVM च्या संदर्भात आम्ही बैठक घेणार असल्याचंही ते म्हणाले. जल्लोष दिसत नाही आहे.शोककळासारखं वातावरण दिसतंय.मरकटवाडीला जाण्यासंदर्भात देखील आम्ही विचार करतोय. असं वडेट्टीवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार बेनामी मालमत्ता प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने मोठा दिलासा दिला . 2021 च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या . न्यायाधिकरणाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध असणाऱ्या बेनामी मालमत्तेचे आरोप फेटाळून लावले .शपथविधी झाल्यानंतर लगेचच अजित पवारांना हा मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राजकीय घटनांना राज्यात वेग आलाय . महाविकास आघाडीतील नेते या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपवर हल्लाबोल करताना दिसतायत .शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचं भाजपवर हल्लाबोल केला आहे. शपथ घेताच अजितदादांची एक हजार कोटीची संपत्ती मुक्तता केली, त्यामुळे मी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, अजित पवार यांचेही अभिनंदन करतो असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.