एक्स्प्लोर

Sanjay Raut : अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे एकमेकांनी, संजय राऊत यांचं भाई जगतापांच्या साक्षीनं चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सूचक वक्तव्य

Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना पाहताच पुन्हा एकत्र यायला पाहिजे असं म्हटलं.

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.यासाठी मतदान सुरु आहे. आमदारांकडून मतदान सुरु असताना संजय राऊत (Sanjay Raut) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी हस्तोंदलन केलं. यानंतर संजय राऊत आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट झाली. चंद्रकांत पाटील यांनी माघारी येऊन संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे एकमेकांनी असं म्हटलं. मात्र, हा संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले. माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.   

 महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी होतील. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, आमचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे उमेदवार विजयी होतील, असं संजय राऊत म्हणाले. राजकारणात आम्ही दिल्लीत मोदींना भेटतो, अमित शाह लॉबीत भेटतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत. आमचे त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही. ते वैचारिक भांडण आहे. 

आम्हाला बघून प्रत्येकाला माघारी फिरावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले. जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अजित पवार, रमेश चेन्निथला भेटले. चांगलं वातावरण आहे आणि ते तसंच रहायला पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण निर्मळ होतं.महाराष्ट्राच्या राजकारणात विषाचा प्रवाह दुर्दैवानं भाजपनं सुरु केला, असं संजय राऊत म्हणाले. 

अनिल देशमुख तुरुंगात होते आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला गेला होता. निवडणूक आयोग तटस्थ असेल तर गणपत गायकवाड यांना मतदान करु देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. 

महाविकास आघाडीचे तीन उमेदवार जिंकतील, असं संजय राऊत म्हणाले. इतकी वर्ष एकमेकांसोबत काम केलं, भेटी गाठी होत असतात. आमचं त्यांच्यासोबत वैयक्तिक भांडण नाही, राजकीय आहे.चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चहा पिण्यासाठी एकत्र यायचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. 

विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवार

भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत 
शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे a
राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर 
काँग्रेस : प्रज्ञा सातव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पुरस्कृत : जयंत पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : मिलिंद नार्वेकर   

संबंधित बातम्या : 

Vidhan Parishad election Live Updates : मोठी बातमी! गणपत गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी, निवडणूक आयोगाचा निर्णय

गणपत गायकवाड वेटिंगवर, मनसेच्या राजू पाटलांचं ठरलं, मोहिते पाटील भाजप कार्यालयात, विधानभवनात काय घडतंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Andhrapradesh Fire : बिडी पेटवली, काडी फेकली अन् भडका उडाला; धक्कादायक व्हिडीओ ABP MajhaZero Hour Manoj Jarange : 700 ते 800 उमेदवार इच्छुक, मनोज जरांगे यांनी विधानसभेचा प्लॅन ठरवला?ABP Majha Headlines : 08 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : Eknath Shinde Manoj Jarange यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात, हाकेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
Embed widget