Zero Hour Manoj Jarange : 700 ते 800 उमेदवार इच्छुक, मनोज जरांगे यांनी विधानसभेचा प्लॅन ठरवला?
Manoj Jarange Patil , जालना : "महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतलीये. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवारांचं फार भयाण काम आहे. उमेदवार पाहिले की वाटतं कुठून या लफड्यात पडलो. मरणाचे उमेदवार आहेत. माझ्याकडे 700 ते 800 लोक आले. आम्हाला वाटतं होतं की मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातून (Western Maharashtra) आले. त्यानंतर नंबर 2 ला मराठवाड्यातून (Marathwada) आले. आम्ही त्यासाठी लोक बसवलेत. मला त्यातील जास्त काही जमत नाही", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. ते एबीपी माझाला दिलेल्या Exclusive मुलाखतीत बोलत होते.
आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज विशेष गोष्ट मला मराठा समजाला सांगायची आहे. पण सरकार डाव टाकतेय, हे समाजाला सांगणे आवश्यक आहे. सरकारने दोन दिवसात नवीन डाव टाकला असून त्यांनी निवडणुकाच डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. त्यामुळे सरकार आपली भूमिका आहे याची वाट पाहतेय.