एक्स्प्लोर

Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

कांद्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) हालचाली सुरु केल्याची माहिती मिळतेय. सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलंय.

Onion News : सध्या बाजारात शेतकऱ्याच्या (Farmers) कांद्याचा चांगला दर (Onion Price) मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. चार पैसे अधिकचे त्यांच्या खात्यात जात आहेत. दरम्यान, अशातच कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं (Central Govt) हालचाली सुरु केल्याची माहिती मिळत आहे. सरकार बफर स्टॉक केलेला कांदा बाजारात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण राबवत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandip Jagtap) यांनी केलीय.

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे धोरण

नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात कांद्याचा बफर स्टॉक केला आहे. तो बफर स्टॉक  बाजारात उतरवण्याची तयारी केंद्र सरकारनं केली असल्याचे संदीप जगताप म्हणाले. सध्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नव्हते. आज शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत आहेत. मात्र, अशात जर सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला तर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम सरकार करेल असे जगताप म्हणाले. 

...तर विधानसभेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना दुष्परीणाम भोगावे लागतील

नाफेडमार्फत केंद्र सरकारनं शेतकऱ्यांनाकडून ज्या कांद्याची खरेदी केली आहे, तो कांदा सरकारनं जगातल्या इतर देशात विकावा. कारण परदेशात भारतीय कांद्याला मोठी मागणी असल्याचे जगताप म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला कांद्याच्या धरसोडीच्या धोरणाचा मोठा फटका बसला होता. या मुद्यावरुन शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आता आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार्श्वभूमीवर जर केंद्र सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवला आणि शेतकऱ्यांच्या कांद्याचा दर पाडला तर येणाऱ्या विधानसभेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना दुष्परीणाम भोगावे लागतील. स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील गप्प बसणार नाही, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा संदीप जगताप यांनी दिला आहे. 

दरम्यान, कांद्याच्या संदर्भात सरकारच्या धोरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कांद्याला दर होता, त्यावेळी देखील सरकारनं निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. 

महत्वाच्या बातम्या:

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका, शेकडो ट्रक कांदा सिमेवर, राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरलीUlhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरूZero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget