एक्स्प्लोर

अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार

अंबरनाथ मधील एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग जुलैमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठाणे : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता बदलापूरजवळील अंबरनाथमध्येही असाच अल्वपयी मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा महिलांवरी अत्याराचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे दिसून येते. अंबरनाथ मधील 9 वर्षीय अल्पवीयन मुलीवर तिच्या घरासमोरील सार्वजनिक शौचालयाशेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय नराधमानाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

अंबरनाथ मधील एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग जुलैमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी आणि पीडित हे शेजारी राहत आहेत, एकमेकांचे ओळखीचे देखील आहेत. जुलै महिन्यात  पीडित एका शौचालयजवळ आली होती, तिला आरोपीने अश्लील व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर, हे प्रकरण आपसात मिटवून घेतले. मात्र, 20 ऑगस्ट रोजी पीडित आणि आरोपी यांच्या कुटुंबात पुन्हा वाद झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन मागच्या महिन्यात घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. आरोपीला उल्हासनगर न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे. मात्र, या घटनेमुळे अशा कितीतरी घटना समाजात घडत असून दाबल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. समजातील अशा विकृतींना वेळीच ठेचलं पाहिजे, तरच अशा घटनांना आळा मिळेल. त्यासाठी केवळ कायदा करुन नाही, तर कायद्याच कठोर अंमलबजावणी करणे गरजेची असल्याची भावनाही वेळोवेळी व्यक्त होत आहे. 

24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद 

दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून महाविकास आघाडीकडून येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. तरी जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरलीUlhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरूZero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget