एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर

चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठावाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असून आज ते गडचिरोली जिल्ह्यात आहेत. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून राज ठाकरेंनी गडचिरोली जिल्ह्यातील साकोली येथील मनसैनिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, चंद्रपूर येथील बैठकीत राज ठाकरेंनी मनसेच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे, विधानसभेसाठी मनसेकडून आत्तापर्यंत एकूण 6 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून राज ठाकरेंनी उमेदवारांच्या बाबतीच षटकार ठोकला आहे.

चंद्रपूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चंद्रपूर (Chandrapur) आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Election) सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, यापूर्वी मराठावाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर, विदर्भ दौऱ्यात 2 उमेदवारांची घोषणा झाल्याने मनसेनं (MNS) विधानसभेचा षटकार ठोकल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात सोलापूरमधून केली होती. सोलापूरमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांनी धाराशिव ते हिंगोली असा मराठवाडा दौरा केला. या दौऱ्यात सोलापूरमधूनच त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह दिलीप धोत्रे या दोन उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, मुंबईतील शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, लातूर येथून आणखी एका उमेदवारांची घोषणा करण्यात आली. लातूर ग्रामीणसाठी संतोष नागरगोजे यांना मनसेचं तिकीट देण्यात आलं आहे. तर, हिंगोली दौऱ्यावर असताना हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी बंडू कुटे यांना राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली होती. यावेळी, कुटे यांच्या खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्हीच यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहनही मनसैनिकांना केलं होतं.  

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार

1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर

उमेदवारी जाहीर करताच मनसैनिकांत राडा

चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटात हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी विदर्भात जाहीर केलेल्या 2 उमेदवारांपैकी राजूरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आहे. चंद्रप्रकाश बोरकर हे मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव असून त्यांच्या कार्यकर्त्यांचा सचिन भोयर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध होता, आणि त्या मुद्द्यावरूनच दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादावादी झाली आणि नंतर प्रकरण धक्काबुक्की आणि एकमेकांना मारण्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ulhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरूZero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?Zero Hour Guest Centre  : राज्यात किती जागांवर भाजपला तगडं आव्हान?  Raosaheb Danve गेस्ट सेंटरवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget