Prajakta Mali on Karuna Sharma : करुणा शर्मांना नोटीस, सुरेश धसांनी माफी मागावी, प्राजक्ता माळीचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!
Prajakta Mali on Karuna Sharma and Suresh Dhas, Mumbai : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांचा निषेध नोंदवलाय.

Prajakta Mali on Karuna Sharma and Suresh Dhas, Mumbai : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी शनिवारी (दि.28) मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिचं नाव घेतलं होतं. यापूर्वी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी हिच्या नावाचा उल्लेख केला होता. दरम्यान, सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केल्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळी हिने मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस (Suresh Dhas) यांनी माफी मागावी, असं म्हटलंय. तर करुणा शर्मा यांनी नोटीस पाठवली होती, त्यानंतर त्यांनी माझ्या विषयी कोणतंही भाष्य केललं नाही, असं प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सांगितलंय.
प्राजक्ता माळीचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!
बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली, त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे. काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेने मी या सगळ्याला सामोरी जाते. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना आणि ही माझी शांतता, माझी मुकसंम्मती नाहीये. मी, माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेटलेल आहे. एक व्यक्ती आपल्या कुठल्यातरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो. मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटत आता आपण बोललच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं कर्मप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग ही परत व्यक्ती बोलते ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रु निघत राहते आणि सगळ्यांच मनोरंजन होतं. हे होऊ नये. सगळ्या समाज माध्यमासमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी आज पडले नाही. मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही. मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे. त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार. स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद हा एकमेव, एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी उठावी, त्याला मी का प्रतिउत्तर देऊ? जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते, दहा लोकांपर्यंतची गोष्टी हजार लोकांपर्यंत पोहोचतात. ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार? त्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यायचं? म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शांत रहा, धीराने सामोरी जा, या आशा अवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात, तू शांत रहा, धीराने सामोरी जा, ह्या सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास. त्यामुळे मला माझ्या चारित्यावरचं एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली नाही. आज ही वेळ येतीय ही अत्यंत नामुष्की आहे. आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणणी करतात. एखादी रुमर आहे रुमरचही खर त्याला स्थान नाहीये. पण एखादी असच उठलेलं वावटळा विषयी जेव्हा लोकप्रतिनिधी जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय. आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांच रक्षण करावं, आपलं रक्षण करावं, अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात, तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले, काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी कधी भाष्य केलं नसतं पण काल त्यांनी ते. केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोंच नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धर साहेबांना, तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत, तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमच जे काय चालू आहे, तुमच जे काय चालू लखलाभ, तुम्ही ते करत रहा, या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता, आम्हा कलाकारांचा याच्यामध्ये काय संबंध काय? बीड मध्ये काहीतरी कायदा, सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिशय कष्टान ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिली मधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायच तुम्ही पुरुष कलाकारांची नाव द्या पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नाव घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला, त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नाव घेतली, अतिशय कुच्छितपणे टिपणणी केली, अतिशय कुच्छितपणे, एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांच मनोरंजन करणं, हे कलाकारांच काम आहे आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केले. आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात. या आधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतीतीयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. बर ते जे बोललेत. कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टांनी आणि मेहनतीन एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत? ही अशी टिप्पणणी करून तुम्ही माझी नाही, आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवता असं मला वाटत आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे. मला पाणी आणि टेशू द्या. महिलांची अबरू, स्पेशली फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर, फार सॉफ्ट टारगेट, कोणीही यावं, पटकन नाव घेऊन जावं, तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते, तुमच्या वैयक्तिक राजकारण साठी तुम्ही फिल्म क्षेत्रात मधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुच्छितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमासमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारणांना शोभत नाही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच. ज्या कुच्छितपणे त्यांनी टिप्पणणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं? याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीच नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छितते. की अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्री मधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये. पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छते, मी आज महिला आयोगाकडे तक्रार गेलेली आहे. फोन सायलेंट करा. महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे. मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे. की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्यती कारवाई करावी. मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन, याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते, काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या, पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात, इतके वाईट मथळे देतात, हेडलाईन्स देतात, समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या? मुळे एक बादळ येऊ शकतं, त्यांच्या करियरवर परिणाम होऊ शकतो, त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते, त्यांचा करियर बरबाद होऊ शकत, ते डिप्रेस होऊ शकतात, ते आत्महत्या करू शकतात, तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची, आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी, आपण आपला एक सेट टारगेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो, त्याच किती वेगवेगळ्या पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल कालच मी. माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये, हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय. समाजामध्ये अशा पद्धतीने प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करण्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तुम्ही सगळेजण हे समजू शकता. तुम्हा सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी. बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत यानिमित्ताने मी करुणादाईना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही. राहिल्या आणि चिखल फेक करत राहिल्या तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल, youtube चॅनल्सनी याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत. त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे करतायत. म्हणून अशा पद्धतीने महिला कलाकारांची अबरू वेशीला टांगली जाते. तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता. हजार कार्यक्रमामध हजार माणसांबरोबर नाव जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धजावणार नाहीत पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेतात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता, स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वापरता हे अत्यंत चुकीच आहे आणि स्पेशली महिलांची नाव पटकन कशी तोंडावर येतात, पुरुषांची नाव का येत नाहीत? यासाठी एक टूल बनवल जात महिला कलाकारांना याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी, आदेश द्यावेत. सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी. आणि म्हणून सुद्धा, एक मराठी माणूस म्हणून सुद्धा, आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं. मी माझं पूर्ण करते भाऊ. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं आहे. की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत. सोशल मीडियावर वाटतेल तसे लोक व्यक्त होतायत. मॉर्फ करणं, व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग, फेक जनरेट करणं. ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यान घ्यावी. इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलते. इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीन बोलतीय. आज त्यांचा प्रतिनिधित्व करते असं मी म्हणेन की समाजामध्ये उजळ माथेन जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे. एक मानसन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे. आणि तो मानसन्मान देणे गरजेच आहे असं मला वाटत आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा व्यक्त करते प्रश्न असा होता पद्धतीने जाहीर माफी मागणार नाही मी त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या कुच्छितपणे. भाषा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय ज्याला काही बेस नाही. तर मी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब. साहेबांना जाऊन भेटणार आहे, त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकीलां मार्फत मी योग्यती कारवाई करेन आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीने पाऊल उचलेनदार आहे आमदार आहे. त्यानंतर त्यांनी काही वक्तव्य केलं नाही त्या शांत बसले त्यामुळे मी पुढे काही त्यांच्यावर कारवाई केली नाही तुमच्या मागे कंभीरपणे उभी आहे का? डेफिनेटली आहे मराठी चित्रपट सृष्टी सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि मी सगळ्यांचे नेतृत्व करेन पत्रकार परिषद चालू आहे त्यांच्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाशी की संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी मला हेच सांगायच तुम्हाला सगळ्यांना हेच सांगण्यासाठी आज मी आली आहे की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नाव का जोडताय कलाकारांचा आणि काही एक संबंध नाहीये. तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्यासमोर इथे नसते. मी आज माझ्या ज्योतिर्लिंग यात्राला असते. त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसाव लागतय त्यांनी सुरू केली ही गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो ओढून आणू नका इस्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका. कलाक्षेत्रातील इथे मुलगी बोलते. पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळीला कधी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर गप्प राहण्यामध्ये का? कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेख चालू राहते. विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोहोचतो. आज तुम्हाला काय वाटतय, आज तुम्हाला काय वाटत हे हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत आणि बरेच बरीच मंडळी मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही. बऱ्याच क्षेत्रांमधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीर पण चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स रेगुलेशन्स आले. थोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, ही या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा youtube चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हाच जाऊन हे बंद होणार आहे तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना पण तुम्हाला जाणी जाते नाही नाही असं काही त्यांनी माफी नाही मागितली तर पुढची भूमिका काय असेल मला हा नियम आणायचा आहे मला या निमित्तान प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुरावा पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका केलं नाही पाहिजे ते खोट आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे हे माझ खर उद्दिष्ट झाल आता स्वागत आहे. हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत, यामागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दूधखुळी नाहीये, त्यांना जे आडून आडून बोलायच होत हे सगळ्यांना कळतय, त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलून असं नसतं, नुसत ताई म्हणून काही होत नाही, त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचे चारित्र्य एवढ्या रिएक्शन सुद्धा डागाळू शकत, समाज माध्यमासमोर, प्रसार माध्यमासमोर. हे कळलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होतात हे कळल पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत, हे आता माझं मोठा उद्दिष्ट आहे, एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा, त्यांची माफी एवढा छोटा विचार मी नाही करणार, या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत, काहीतरी रूल्स रेगुलेशन बसले पाहिजेत, इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला ही मी आज ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी घेऊन म्हणते, भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिला. ला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोर जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन आता तुम्ही म्हणाला की कला राजाश्रय मिळाल्याने मोठी होते.
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
इतर महत्त्वाच्या बातम्या























