एक्स्प्लोर

Laxman Hake : वाल्मिक कराडसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांना माझ्यासकट जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची मागणी; धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड सोबत ज्या ज्या नेत्यांचे फोटो आहेत त्यांना माझ्यासह जेलमध्ये टाका, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

Laxman Hake : बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यू प्रकरणाचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी व ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) सोबत ज्या ज्या नेत्यांचे फोटो आहेत त्यांना माझ्यासह जेलमध्ये टाका, असे वक्तव्य  केले आहे. तसेच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas), सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरही लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधलाय. 

लक्ष्मण हाके म्हणाले की, परभणीमध्ये पोलिस आणि जिल्हाधिकारी यांनी सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांची भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्याचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच राज्याच्या यंत्रणेचे हे फेल्युअर असल्याचे  त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

धस, दमानिया, जरांगेंवर हल्लाबोल   

ते पुढे म्हणाले की, अंजली दमानिया या केवळ सनसनाटी निर्माण करतात, त्यांनी उचललेल्या प्रश्नांचे पुढे काय होतं हे सर्वांना माहिती आहे.  ज्या ज्या नेत्यांचे वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो आहेत, त्या सर्वांना माझ्यासह जेलमध्ये टाका. म्हणजे तिथं उद्बोधन करता येईल. सुरेश धस यांनी जसं देशमुख प्रकरण लावून धरलं तसेच त्यांच्या मतदारसंघातील बिट्टू गायकवाड कुठे आहे? हे देखील सांगावे. मनोज जरांगे आम्ही तरी केवळ एकच आंदोलन केले तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढत असल्याचे म्हणत लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस, अंजली दमानिया आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. आता लक्ष्मण हाकेंच्या टीकेला धस, दमानिया आणि जरांगे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

लातूरमध्ये धनगर समाज आक्रमक

दरम्यान, लातूरमध्ये टाकळी येथे धनगर समाजाच्या माऊली उमाकांत सोट या 18 वर्षीय तरुणाला गावातीलच सात आठ जोकांनी जबर मारहाण केली होती. यानंतर दोन महिने उपचार करूनही प्रकृती न सुधारल्याने 6 जानेवारीला त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात या कुटुंबाने आणि धनगर समाजाने योग्य ती कारवाई करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या कुटुंबाला भेटण्यासाठी लक्ष्मण हाके लातूरमध्ये येणार आहेत.  

आणखी वाचा 

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget