एक्स्प्लोर

Dhananjay Munde on Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीत प्रवेश केला, मग ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी कशी? धनंजय मुंडेंचा सवाल

Dhananjay Munde on Bajrang Sonwane : बजरंग सोनवणे यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीत प्रवेश केला, मग बीडमधील लोकसभा निवडणूक मराठा बिरुद्ध ओबीसी कशी? असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय.

Dhananjay Munde on Bajrang Sonwane : बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसीत प्रवेश केला, मग बीडमधील लोकसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी कशी? असा सवाल मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी उपस्थित केलाय. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी आज आष्टीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. 

सर्वात पहिल्यांदा गरीब कुटुंबांचे कुणबी प्रमाणपत्र काढून दिले असते

धनंजय मुंडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला माझे यश आलं. याचा फायदा सर्वात पहिल्यांदा बजरंग सोनवणे यांनी घेतला. त्यांनी आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घेतलं, मी जर त्यांच्या जागी असतो तर सर्वात पहिल्यांदा गरीब कुटुंबांचे कुणबी प्रमाणपत्र काढून दिले असते, असे म्हणत मुंडेंनी पुन्हा एकदा सोनवणे यांच्यावर टीका केली. 

हे जातीपातीचे राजकारण परवडणार नाही

पुढे बोलताना मुंडे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत मी मराठा आहे असं सांगायचं आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय म्हणून अर्ज भरायचा. हे जातीपातीचे राजकारण परवडणार नाही. कुणी कोणत्या जातीत जन्माला यायचं हे आपल्या कोणाच्याच हातात नाही, मी देखील मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत आहे, असंही मुंडे यांनी सांगितलं. 

बीड जिल्हा कर्तृत्व पाहून मतदान करत असतो

बीड जिल्ह्याच्या जनतेने 1957 मध्ये देखील जातीपातीचा विचार न करता कर्तुत्वान असलेले ब्राह्मण समाजाचे नेते परांजपे यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून दिलं होतं. बीड जिल्ह्याची जनता कधी जात-पात पाहत नाही, तर कर्तुत्व पाहून मतदान करत असते. बीड जिल्हा हा नेहमी जातपात पाहून नाही तर कर्तृत्व पाहून मतदान करत असतो हे काही लोकांना अजूनही कळालेलं नाही. 

सरकारने शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे.  सगे सोयऱ्याच्या संदर्भात थेट जीआर काढता येत नाही, त्यासाठी अगोदर परिपत्रक काढावे लागते. परिपत्रकावर आलेले आक्षेप निकाली काढून त्याचा जीआर नंतर काढला जातो. येत्या काही महिन्यात काम पूर्ण होईल असं धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलताना म्हणाले. धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात 70 हजार कुणबी प्रमाणपत्र मिळाले याचा मला अभिमान वाटतो. मी देखील सगे सोयऱ्याच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या बाजूने आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Mangesh Sable and Manoj Jarange : अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि जरांगे समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget