Vice Presidential Election 2022: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपचा मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा, पक्षाच्या बैकठकीनंतर संजय सिंह यांची घोषणा
Vice Presidential Election 2022: येत्या का ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Vice Presidential Election 2022: येत्या का ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी पक्षाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पक्षाने आज बैठक बोलावली होती.
या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी, दुर्गेश पाठक, इमरान हुसैन, संजय सिंह, राखी बिडलान आणि राघव चढ्ढा उपस्थित होते. सध्याच्या समीकरणानुसार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतील.
मायावती आणि जेएमएमने स्पष्ट केली भूमिका घेतली
आज बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती यांनी धनखड यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. त्याचवेळी झारखंडमधील सत्ताधारी जेएमएमने मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जेएमएमने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता.
याच दरम्यान मार्गारेट अल्वा यांनी काही दिवसांपूर्वी सर्व खासदारांना पत्र लिहून म्हटले आहे की, निवडून आल्यास विविध राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचं, राष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यासाठी आणि संसदेचा अभिमान बहाल करण्यासाठी त्या काम करतील. त्या म्हणाल्या की, "बदलाची वेळ आली आहे. उपाध्यक्षपदाची निवडणूक ही पक्षाच्या व्हिपच्या अधीन नसून गुप्त मतदानाद्वारे घेतली जाते. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 2022 साठी (Vice President Election 2022) निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Congress Tiranga Row: विरोधकांना तिरंग्यातही भाजप दिसू लागला असेल तर काय म्हणावे, राहुल-प्रियांका गांधींना भाजपचा टोला
Aurangabad: मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रारीवरून शिंदे गट आणि पोलिसात वाद; समर्थकांची ठाण्याबाहेर गर्दी
अवैध पद्धतीने माहितीचे हस्तांतर करणारे 348 Apps ब्लॉक, चीनच्या अॅप्सचाही समावेश; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती