Mahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?
Mahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?
हेही वाचा :
भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.शनिवारी संध्याकाळी त्यांच्या समर्थकांनी भिवंडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे,तालुका प्रमुख कुंदन पाटील, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, काँग्रेस,पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुपेश म्हात्रे यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.
कल्याण मध्ये एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी भिवंडीत आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मोठी असताना सुद्धा चार पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काम केलं.प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा, असा सवाल रुपेश म्हात्रे यांनी केला.
वरळीत उद्धव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीत समाजवादी पक्षाला शिवसेना पक्षाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. आम्ही हा अन्याय कदापी सहन करणार नसून या निवडणुकीच्या मैदानात लढणार असा ठाम निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी व्यक्त करीत पक्षा विरोधात बंड पुकारले आहे.मी कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकवण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मला जनतेच्या मदतीने ही निवडणूक जिंकायची आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे .