एक्स्प्लोर

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

'जयश्रीताई, तुमच्या या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? असा सवाल संजय पवार यांनी एका पत्रकाद्वारे आमदार जयश्री जाधव यांना विचारला आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने सुद्धा त्यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. शिवसेना उपनेते तथा कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'जयश्रीताई, तुमच्या या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? असा सवाल संजय पवार यांनी एका पत्रकाद्वारे आमदार जयश्री जाधव यांना विचारला आहे. 

तुमच्यासाठी राबविलेल्या जनतेची फसवणूक तुम्ही का केलीत?

संजय पवार यांनी म्हटलं आहे की, कुठल्याही क्षेत्रातलं काम हिरीरीनं करणारा चंद्रकांत आण्णांचा स्वच्छ निरपेक्ष समाजसेवी असा एक चेहरा अनपेक्षित राजकारणामध्ये आला. तसं म्हटलं तर तत्कालिन गद्दार उमेदवार हा उध्दवजींच्या शिवसेनेचा असला तरी सर्वसामान्यांना दिलेला त्रास व समाजातला प्रत्येक घटकाला दिलेला उपद्रव यामुळं जनतेनं या गद्दाराचा चोख हिशोब मतपेटीद्वारे बजावला. आणि कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच एक उद्योगशील असं व्यक्तीमत्व शहराचा आमदार झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीमुळे उसना आव आणत जयश्रीताईंनी माझ्यावर अन्याय झाला म्हणून शिंदे गटामध्ये कोलांटउडी मारली. चंद्रकांत आण्णांच्या पश्चात आपली जबाबदारी या एकाच भावनेतून नगरसेवक असणाऱ्या आमच्या बहिणीला महाविकाससाठी आघाडीतल्या सर्वच घटकांनी निवडून आणले. पण ह्या उपकाराची व आपल्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्त्यांचा अपमान करत सोयीनुसार निव्वळ प्रलोभनाला बळी पडलात, तुमच्यासाठी राबविलेल्या जनतेची फसवणूक तुम्ही का केलीत? असा सवाल पवार यांनी या पत्रकाद्वारे विचारला.

तर अपक्ष उमेदवारी तुम्ही का लढवली नाहीत?

तसंच, जर निवडून येण्याची एवढीच तुम्हाला खात्री होती तर अपक्ष उमेदवारी तुम्ही का लढवली नाहीत.? उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानत हात चिन्हाचा प्रचार करणाऱ्या हिंदूत्ववादी शिवसैनिकांची काय चूक होती? गद्दार वृत्तीला साथ देण्याची तुमची ही सध्याची नवीन जबाबदारी आता कोल्हापूरच्या पेठापेठातील व उपनगरांमध्ये वसलेल्या जनतेला कृतघ्नपणाची वाटू लागलीय. तुमच्या या अवसानघातकी  कृतघ्नपणाच्या पक्षांतराचे उत्तर द्या. या निवडणुकीमध्ये गद्दाराला हद्दपार केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा इशाराही पवारांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशयSuresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरीGold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
RBI : गृह कर्ज अन् वाहन कर्ज आणखी स्वस्त होणार? आरबीआय एप्रिलमध्ये 'या' तारखेला पतधोरण जाहीर करणार
घर अन् वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आरबीआय व्याज दर घटवणार? पतधोरण 'या' दिवशी जाहीर होणार
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
Embed widget