Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
आता आठवड्याभरातच दुसऱ्यांदा शहरात एका हॉटेलमध्ये या गुंडाने हाणामारी करत राडा घातला आहे . या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे .
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात आईन दिवाळीत कुठल्यात गुंडाची दहशत माजली आहे. वर्षभर जेलमध्ये घालवून बाहेर येताच या गुंडाने आठ दिवसातच दुसऱ्यांदा राडा घातल्याचं समोर आलंय. टिप्या नामक गुंडाणे अनेकांवर जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं असून नुकताच या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ ही समोर आलाय . लुटमारी ,जीवघेणे हल्ले ,खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या गुंडावर दाखल झालेले आहेत . मागील आठवड्यातच दहशत वाजवल्याप्रकरणी टिप्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही आठवड्याभरातला हा या गुंडाने हॉटेलमधील लोकांना मारहाण करत गोंधळ घातल्याचे दिसले .
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरचा पोलीस आयुक्तांनी शहरात अनेकांवर कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटताच या गुंडाने रॅली काढत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता . आता आठवड्याभरातच दुसऱ्यांदा शहरात एका हॉटेलमध्ये या गुंडाने हाणामारी करत राडा घातला आहे . या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे . या घटनेत हॉटेलमध्ये जेवत असताना एका टोळक्याने बसलेल्या शेजारी बसलेल्या काही लोकांना मारायला सुरुवात केली. दुसऱ्या टेबलवर बसलेल्या काही जणांनीही त्या व्यक्तीस बेदम मारल्याचे दिसले. पूर्ववैमनस्यातून ही हाणामारी झाल्याचा संशय आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका...
काही दिवसापूर्वी जेलमधुन सुटताच कुख्यात गुंड टीप्याची रॅली काढत दहशत माजवली होती. आता हॉटेलमध्ये एन दिवाळीच्या रात्री कुख्यात गुंड टीप्याचा अनेकवार हल्ला केला आहे. वाढत्या गुन्हेगारी पाहता वर्षभर पूर्वी स्थानबद्धतेची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली होती.
ऐन दिवाळीत कुख्यात गुंडाची दहशत
लुटमारी, जीव घेणे , खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांखाली वर्षभर अटकेत असणारा कुख्यात टिप्या नामक गुंड वर्षभर जेलमधून बाहेर येताच आठवड्याभरात दुसऱ्यांदा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे . शहरात ऐन दिवाळीत एका हॉटेलमध्ये या गुंडाने हाणामारी करत गहजब केला . यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र पोलिसांच्या गाडी शेजारीच आरोपी लघुशंका करताना दिसला . त्यामुळे पोलिसांचा बडगा ऐन दिवाळीत सैलावल्याची बोलले जात आहे .