एक्स्प्लोर
Sharad Pawar Mimicry : चष्मा काढला, रुमाल घेतला अन्.., अजितदादांची 4 सेकंदांची मिमिक्री करून शरद पवारांची तुफान बॅटिंग!
अजित पवार यांनी घरफोडीबाबत विधान केलं होतं. यावेळी ते भावनिक झाले होते. शरद पवार यांनी आता अजित पवार यांची नक्कल केली आहे.
sharad pawar ajit pawar mimicry (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

यावेळीची विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून काका-पुतण्या अश लढत होणार आहे.
2/8

येथे अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. 28 ऑक्टोबर रोजी या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
3/8

दरम्यान, युगेंद्र पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांचा उल्लेख करून त्यांनी घरफोडीबाबत विधान केलं होतं.
4/8

यावेळी बोलताना अजित पावार चांगलेच भावूक झाले होते. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या याच विधानांचा समाचार घेतला. हा प्रश्न भावनेचा नाही. हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो, असे शरद पवार म्हणाले.
5/8

तसेच गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे, असेही शरद पवार म्हणाले.
6/8

दरम्यान, हे विधान करण्याआधी त्यांनी केलेल्या एका अॅक्शमुळे सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला, एकच हास्यकल्लोळ उडाला.
7/8

अजित पवार 28 ऑक्टोबरच्या सभेत भावूक झाले होते. त्याचीच नक्कल शरद पवार यांनी केली. त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमाल घेतला.
8/8

सोबतच त्यांनी रुमालाने डोळे पुसून अजित पवार भावूक झाल्याची नक्कल केली. त्यांच्या या नक्कलीने सभेत एकच हशा पिकला. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
Published at : 29 Oct 2024 02:15 PM (IST)
आणखी पाहा























