एक्स्प्लोर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, पण अजुनही महायुती, मविआचं जागावाटपाचं भिजत घोंगड; मोठा फटका बसणार?
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर होती.

Maharashtra Assembly Election 2024
1/8

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली असली, तरी राज्यातील सुमारे 15 जागांवर अद्याप स्पष्टता नाही.
2/8

काँग्रेसनं MVA मध्ये 103 उमेदवार उभे केले आहेत, तर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांनी 87 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. येथे 11 जागांवर गूढ कायम आहे.
3/8

भाजपनं आतापर्यंत 152, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं 52 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 80 उमेदवार उभे केले आहेत. त्यात त्यांनी छोट्या मित्रपक्षांना दिलेल्या जागांचाही समावेश आहे.
4/8

भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनीही शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या तिकिटावर मुंबादेवीतून उमेदवारी दाखल केली. नावाची घोषणा झाल्यानंतरही भाजपच्या सदस्यांमध्ये त्या जागेवरून निवडणूक लढवण्याची स्पर्धा दिसून आली.
5/8

विरोधकांच्या छावणीत अनेक आठवड्यांच्या गदारोळानंतर, जागांवर उमेदवार देण्याबाबत संभ्रम असताना, सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीला आपल्या बंडखोरांची चिंता आहे.
6/8

भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते पक्ष बदलून इतर पक्षांतून निवडणूक लढवत आहेत, तर काही अपक्ष म्हणून सामील झाले आहेत.
7/8

निवडणूक अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. सर्वात चर्चेचा विषय ठरला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी भरलेले दोन उमेदवारी अर्ज.
8/8

मानखुर्द मतदारसंघातून त्यांनी दोन अर्ज दाखल केले होते. एक अपक्ष म्हणून आणि दुसरा राष्ट्रवादीचा सदस्य म्हणून, अशातच पक्षानं त्यांना मुदतीच्या काही मिनिटं आधी पाठिंबा दिला.
Published at : 30 Oct 2024 10:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
