एक्स्प्लोर

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?

Simhastha Kumbh Mela Fund : नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आराखड्यात साठ टक्के कपात करण्यात आली आहे.

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (Nashik NMC) आराखड्यात साठ टक्के कपात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Pravin Gedam) यांनी निधी (Fund) मिळण्याची शक्यता नसल्याने छाननी केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी कुंभमेळ्याशी निगडित कामांचा समावेश करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत. महापालिकेचा अत्यावश्यक आराखडा आता 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर आला आहे. 

आगामी 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर मनपाचा आराखडा पंधरा हजारांहून थेट सात हजार कोटीपर्यंत खाली आला आहे. जवळपास  साठ टक्के फुगवटा कमी आला असून अत्यावश्यक कामाचा त्यात सहभाग करण्यात झाला आहे. मनपा प्रशासनाने सुधारित आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. 

15 हजार 172 कोटींचा आराखडा केला होता सादर

महापालिकेने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे 15 हजार 172 कोटींचा आराखडा सादर केला होता. परंतु, हा आराखडा अवास्तव असल्याने आणि एवढा निधी मिळण्याची शक्यता नसल्याने त्याची छाननी करून तो कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. साधू महंत व त्यांचे आखाडे तसेच देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहेत. महापालिकेने कुंभमेळा अनुषंगाने पायाभूत सुविधा व विविध विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार केला होता. 

आठ हजार कोटींची कपात 

त्यात प्रामुख्याने साधुग्राम व पार्किंगसाठी जागा, तिचे भूसंपादन यावरच साडेआठ हजार कोटींचा खर्च धरण्यात आला होता. अंतर्गत रिंगरोड, शहरातील रस्ते व पूल, साधुग्राममध्ये पायाभूत सुविधा या बांधकाम विभागाशी निगडित सहा ते सात हजार कोटींची कामे होती. वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा संकलन, सफाई कर्मचारी आउट सोर्सिंग, ड्रेनेज, मलनिस्सारण गोदा स्वच्छता व सुशोभीकरण, आदी विभागाच्या कामांचा समावेश होता. हा आराखडा तब्बल पंधरा हजार कोटीवर गेला होता. मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासमोर हा आराखडा सादर केला होता. तेव्हा त्यांनी मनपा प्रशासनाचे कान टोचत अत्यावश्यक कामांचा समावेश करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी शर्मा यांनीही कुंभमेळ्याशी निगडित कामांचा समावेश करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने आराखड्यात काटछाट करत तब्बल आठ हजार कोटींची कपात केली आहे. 

आणखी वाचा 

Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्याची लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्याची लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 3PM 25 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावाABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 25 March 2025 दुपारी 02 च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्याची लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्याची लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 मार्चपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, 28 मार्चपर्यंत सरकारी 'पाहुणचार'
Embed widget