एक्स्प्लोर

'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला सुरुवात झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला.

नाशिक : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp ) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका, असे पत्रकार छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर उपरोधिक टीका केली आहे. 

नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे (Bala Darade) यांच्या वतीने पत्रक छापण्यात आले आहेत. त्यात महिलांना योजनेची माहिती देणाऱ्या पत्रकावर मजकूर छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. आमच्या प्रभागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवून देत सरकारवर टीका करणार, अशी भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे. 

1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका

ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे म्हणाले की, या सरकारचे आयुष्य केवळ दोन-तीन महिन्याचे राहिले आहे. जर गरीब महिलांना 1500 रुपये मिळत असतील, तर त्यांना 1500 रुपयांपासून वंचित का ठेवायचे? सरकारने सर्वसामान्य जनतेचा पैसा लुटला आहे आणि तोच पैसा वेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवतील. हे सरकार गद्दारी करून जन्माला आले आहे. त्यामुळे राज्यात या सरकारची बदनामी झाली आहे. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला धूळ चारली. विधानसभेत देखील हे सरकार पायउतार होणार असल्याची जाणीव झाल्यामुळे 1500 रुपये देतो, पण आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी त्यांनी योजना काढली आहे. आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महिलांना 1500 रुपये मिळवून देणार आहोत, तसेच सरकारचा धिक्कार करून आम्ही आंदोलन करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. बाळा दराडे यांच्या आंदोलनाची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं

Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती
प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती
Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल  
Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल  
Pune News : काळ आला होता, पण! 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात; इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली
काळ आला होता, पण! 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात; इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली
ठरलं! वंचितला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वसंत मोरेंनी  पुण्यातील 'या' मतदारसंघावर केला दावा, विधानसभेला  लढणार
ठरलं! वंचितला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वसंत मोरेंनी पुण्यातील 'या' मतदारसंघावर केला दावा, विधानसभेला लढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथकTeam India Wankhede : टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दीABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi NewsPM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती
प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती
Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल  
Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल  
Pune News : काळ आला होता, पण! 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात; इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली
काळ आला होता, पण! 25 विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कुल बसचा अपघात; इंद्रायणी नदीत कोसळता-कोसळता बचावली
ठरलं! वंचितला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वसंत मोरेंनी  पुण्यातील 'या' मतदारसंघावर केला दावा, विधानसभेला  लढणार
ठरलं! वंचितला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वसंत मोरेंनी पुण्यातील 'या' मतदारसंघावर केला दावा, विधानसभेला लढणार
Smriti Biswas : राज कपूर-देवानंद यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ganesh Naik : बारवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंट्सना टार्गेट करू नका, गणेश नाईकांच्या पालिका आयुक्तांना सूचना
बारवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंट्सना टार्गेट करू नका, गणेश नाईकांच्या पालिका आयुक्तांना सूचना
पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
Embed widget