एक्स्प्लोर

प्रेरणादायी... मोदींच्या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल; तेव्हाची इच्छा, आज इच्छापूर्ती

वेस्टइंडिजच्या बारबुडा स्टेडियमवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या 3-4 षटकांत अत्यंत रोमहर्षक लढत झाली

मुंबई : वेस्ट इंडिजच्या जमिनीवर भारताचा तिरंगा दिमाखात उभारल्यानंतर टीम इंडियाचं (Team India) आज मायदेशी आगमन झालं आहे. टीम इंडियाचे आज राजधानी दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत (Narendra Modi) कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल दीड तास चर्चा केली. या भेटीत सर्वच खेळाडूंशी मोदींनी वन टू वन संवाद साधला. तर, खेळाडूंच्या कुटुंबीयांसमवेतही फोटोशूट केलं. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि टी-20 विश्वचषकात घेतलेल्या अफलातून झेलमुळे सर्वांचेच आकर्षण ठरलेला सूर्यकुमार यादवनेही (Suryakumar yadav) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला. मात्र, सूर्या आणि मोदींच्या या फोटोनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं जुनं ट्विट व्हायरल होत आहे. 

वेस्टइंडिजच्या बारबुडा स्टेडियमवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या 3-4 षटकांत अत्यंत रोमहर्षक लढत झाली. द. आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. त्यावेळी, मैदानावर असलेल्या मिलरने पहिल्याच चेंडूवर उत्तुंग शॉट मारला होता. सीमारेषेकडे जाणारा हा चेंडू पाहून आता षटकार गेला, अशीच भावना भारतीयांची झाली होती. मात्र, चित्रपटात अचानक हिरोची एंट्री व्हावी, तशी सूर्यकुमार यादवची सीमारेषेवर एंट्री झाली अन् सूर्याने अफलातून झेल पकडून भारतीय संघाला विजयाच्या काठावर पोहोचले. सूर्याच्या झेलचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यानंतर, या या झेलवरुन बराच वादही झाला. मात्र, भारतीय संघाच्या विजयात शेवटच्या क्षणी सूर्याने टिपलेला झेला अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरला. आज, टीम इंडियासमवेत सूर्याने पत्नीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सूर्या-मोदीच्या या भेटीनंतर सूर्याचं 7 वर्षांपूर्वीचं 28 जुलै 2017 रोजीचं ट्विट व्हायरल झालं आहे.

सूर्याने 28 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.18 मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये, स्वच्छ भारत मिशनचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसमवेत हाती ग्रीन सीटी, क्लीन सीटीचा फलक घेऊन सूर्यकुमार यादव दिसत आहे. भारत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात घेतलेल्या स्वच्छ भारत मिशनबद्दल सूर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. तसेच, भविष्यात संधी मिळाल्यास मी आपणसमवेत खरा सेल्फी घेईन, लकी ठरेल, असे मिश्कील ट्विट सूर्याने केले होते. आता, तब्बल 7 वर्षांनी टीम इंडियाच्या आणि स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर पंतप्रधानांनी टीम इंडियाला विशेष निमंत्रण दिले होते. मोदींसमवेतच्या आजच्या भेटीवर सर्वच भारतीय खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामध्ये, सूर्याही मागे नाही. सूर्यानेही ट्विटरवरुन मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. 

सूर्याचा जुना फोटो व्हायरल

दरम्यान, सूर्याने मोदींसमवेतच्या भेटीचा फोटो शेअर केल्यानंतर अनेक ट्विटर हँडलवरुन सूर्याचा जुना 7 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला आहे. सूर्याची इच्छापूर्ती झाली, स्वप्नपूर्ती झाली.. असे म्हणत काहींना हा फोटो ट्विट केलाय. तर, काहींनी हा फोटो ट्विट करताना सूर्याने घेतलेल्या परिश्रम आणि मेहनतीने हा प्रेरणादायी फोटो असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी एकदिवसी विश्वचषक स्पर्धेनंतरही मोदींनी टीम इंडियाची भेट घेतली होती, त्यावेळी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हाही सूर्याने मोदींनी ड्रेसिंग रुमला दिलेल्या भेटीबाबत ट्विट केलं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPanvel Heavy Rain : पनवेलमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरूपDeekshabhoomi Nagpur : अंडरग्राऊंड पार्किंगची जमीन पूर्ववत करण्याचा निर्णयBuldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
Embed widget