एक्स्प्लोर

Mumbai Rain : टीम इंडियासाठी मुंबईकर रस्त्यावर, धो धो पावसात चाहत्यांचा जल्लोष, वानखेडे हाउसफुल  

Team India Victory Parade Heavy Rain : टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे.

Team India Victory Parade Heavy Rain : टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबईत ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघेल. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. वानखेडे स्टेडियमही फूल्ल झालेय. चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता. रस्त्यावर चाहते दुतर्फा थांबले होते. वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते. जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता. चाहत्यांनीही या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट कऱण्यासाठी उभे राहिले होते. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले होते. मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतेय. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्वागातासाठी उभे असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय. 

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे. कोणत्याही क्षणी टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होऊ शकते. मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे. रोहित आणि टीम इंडिया ओपन बसमधून चषकासोबत चाहत्याचे अभिवादन स्विकारणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. तरीही विजयी मिरवणूक होणार आहे. चाहत्यांचा जल्लोष वाढला आहे. 

 बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना आज प्रवेश मोफत ठेवला आहे. मात्र यासाठी वेळेवर पोहोचण्याची अट होती. त्यामुळे दुपारपासूनच चाहत्यांनी वानखेडेवर गर्दी केली होती. चार वाजताच वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी गजबजले होते.  हजारो लोक स्टेडियमवर पोहोचले आहेत. आता स्टेडियम पूर्णपणे भरले असून दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली टीव्ही-मोबाईलवर पाहता येणार
टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget