एक्स्प्लोर

ठरलं! वंचितला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत वसंत मोरेंनी पुण्यातील 'या' मतदारसंघावर केला दावा, विधानसभेला लढणार

Vasant More: वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक वंचितकडून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुढील राजकीय वाटचाल मोरे हे ठाकरे गटातून पार पाडणार आहेत.  

पुणे : पुण्यातले (Pune News)  मनसेचे माजी नेते वसंत मोरे (Vasant More)  येत्या 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्याबद्दल आज मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray)  भेट घेतली.  उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी आगामी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहे.  पुण्यातील दोन  मतदारसंघावर त्यांनी  दावा ठोकला आहे.  मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक वंचितकडून लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. आता पुढील राजकीय वाटचाल मोरे हे ठाकरे गटातून पार पाडणार आहेत.  

वसंत मोरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत.  आगामी निवडणूक  खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून लढू शकतो.  पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली.  माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू.  शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे.  

'या' मतदारसंघातून मिळू शकते तिकिट

 उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर वसंत मोरेंना   हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकते. वसंच मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत.

...अन् वसंत मोरेंना मिळाली राज्यभरात ओळख

वसंत मोरे यांची स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते अशी ओळख आहे. त्यांनी राज ठाकरेंचे आदेश कधीच मोडले नाहीत. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कोरोना काळात वसंत मोरे यांच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले होते. जनतेची केलेली सेवा ते व्हिडीओमार्फत सोशल मीडियावर टाकतात. त्यामुळेच त्यांना राज्यभरात ओळख मिळाली आहे. 

हे ही वाचा :

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :07 JULY 2024 : ABP MajhaAjit Pawar Baramati : अजित पवार बारामतीत, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारVijay Wadettiwar : मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख नको, हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकाLeopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Embed widget