एक्स्प्लोर

Ganesh Naik : बारवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंट्सना टार्गेट करू नका, गणेश नाईकांच्या पालिका आयुक्तांना सूचना

Navi Mumbai Pub Bar News : शहरातील अनधिकृत पब आणि बारवर नवी मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली होती. त्याला भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी विरोध केल्यानतंर ही कारवाई थांबवण्यात आली आहे. 

नवी मुंबई: लेडिज बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाई करताना फॅमिली रेस्टॉट्ना टार्गेट करू नका अशा सूचना भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांची नवी मुंबई पालिकेला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शहरातील अनधिकृत पब, बारचे बांधकाम तोडण्याची भूमिका नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतली होती. पण गणेश नाईकांच्या विरोधानंतर आता ही कारवाई थांबवण्यात आली आहे. 

शहरात वाढलेले अनधिकृत आणि विना परवाना चालणाऱ्या लेडिज बार, पब, हुक्का पार्लरवर गेल्या काही दिवसात तोडक कारवाई सुरू आहे. महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील जवळपास 50 पब, बार, हुक्का पार्लरचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. 

फॅमिली रेस्टॉरंट्सना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप

अनधिकृत बारवर कारवाई होत असताना विनाकारण फॅमिली  रेस्टॅारंट्सनासुध्दा टार्गेट केले जात असल्याचा आरोप हॅाटेल मालकांनी केला. फॅमिली रेस्टॅारंट्सच्या बाहेर उभारण्यात आलेले पावसाळी शेड तोडू नये यासाठी हॅाटेल मालकांनी भाजपा आमदार गणेश नाईक यांची भेट घेतली होती. यानंतर गणेश नाईक यांनी फॅमिली रेस्टॅारंट्सवर होणारी कारवाई काही दिवस थांबवावी अशी सुचना महानगरपालिका आयुक्तांना केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कारवाईनंतर महापालिकेची कारवाई

पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह तसेच ड्रग्ज सापडल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनधिकृत पब, बार यांच्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले होते. अनधिकृत पब आणि बारमुळे गुन्हेगारीकरण वाढत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले होते. त्याच आदेशाचं पालन करताना नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली. 

गणेश नाईकांचा कारवाईला विरोध

पण महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या तोडक कारवाईला भाजप आमदार गणेश नाईक यांनी आक्षेप घेत त्याला विरोध केला. सरसकट कारवाई करण्यास त्यांनी विरोध केला असून आधी नोटीस द्या आणि मालकांना स्वतः बांधकाम तोडू द्या अशी भूमिका भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतली. त्यानंतर नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईला ब्रेक लागला होता. 

सीबीडीपासून दिघ्यापर्यंत असलेल्या लेडीज बार, पबवर बुलडोझर फिरवण्यात आले होते.  या तोडक मोहिमेत जवळपास 50 लेडिज बार, पब, हुक्का पार्लरचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते. त्यानंतर गणेश नाईकांच्या भूमिकेनंतर महापालिकेने ही कारवाई थांबवली. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :07 जुलै 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmravati Jail : कारागृहामध्ये बाॅम्बसदृश्य स्फोटक फेकल्याने स्फोट; सुदैवानं कुणीही जखमी नाहीJammu Kashmir : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ जवान शहीद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget